Lokmat Money > बिझनेस न्यूज > ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकन कंपनीलाच? अ‍ॅपलनंतर गुगलने घेतला मोठा निर्णय

ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकन कंपनीलाच? अ‍ॅपलनंतर गुगलने घेतला मोठा निर्णय

googles production hub : अ‍ॅपलनंतर आता भारत गुगलचे प्रॉडक्शन हाऊस बनण्यास सज्ज आहे. यासाठी गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट इंकने तयारी सुरू केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 11:07 IST2025-04-22T11:06:29+5:302025-04-22T11:07:03+5:30

googles production hub : अ‍ॅपलनंतर आता भारत गुगलचे प्रॉडक्शन हाऊस बनण्यास सज्ज आहे. यासाठी गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट इंकने तयारी सुरू केली आहे.

Will Trump's tariffs hit American companies after apple india will become googles production hub | ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकन कंपनीलाच? अ‍ॅपलनंतर गुगलने घेतला मोठा निर्णय

ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकन कंपनीलाच? अ‍ॅपलनंतर गुगलने घेतला मोठा निर्णय

googles production hub : भारत लवकरच शेजारी राष्ट्र चीनशी बरोबरी करण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही वर्षात भारत उत्पादन क्षेत्रात आपलं नाव प्रस्थापित करत आहे. यापूर्वी अमेरिकेच्या अ‍ॅपल कंपनीने चीनमधून आपला आयफोन निर्मिती युनिट भारतात हलवलं. आता भारतातून जगभर आयफोनची निर्यात होत आहे. यापूर्वी इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रात चीनचा दबदबा होता. मात्र, चीनचे हे स्थान आता धोक्यात आलं आहे. कारण, आणखी एक मोठी अमेरिकन कंपनी त्यांच्या प्रॉडक्टचं उत्पादन भारतात घेणार आहे. ही कंपनी दुसरीतिसरी कोणी नसून गुगल आहे. 

अल्फाबेट कंपनीने का घेतला निर्णय?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा अमेरिकन कंपन्यांनाही फटका बसत आहे. ट्रम्प यांनी व्हिएतनामवर उच्च आयात शुल्क लादण्याची धकमी दिली आहे. अशा परिस्थितीत व्हिएतनाममधून अमेरिकेत येणारी गुगलची उत्पादने महाग होऊ शकतात. या संभाव्य धोका ओळखून एक युनिट भारतात हलवण्याचा निर्णय अल्फाबेटने घेतला आहे. यासाठी कंपनीने भारतात स्थानिक पातळीवर काही घटकांचे उत्पादन करण्यासाठी कंत्राटदारांसोबत चर्चा सुरू केल्या आहेत. जसे की एन्क्लोजर, चार्जर, फिंगरप्रिंट सेन्सर आणि बॅटरी. सध्या, भारतात उत्पादित होणाऱ्या पिक्सेल फोनचे बहुतेक घटक आयात केले जातात.

ट्रम्प टॅरिफनंतर घेतला निर्णय
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिएतनामवर ४६ टक्के, तर भारतावर २६ टक्के कर लादण्याची घोषणा केली होती. सध्या या निर्णयाला ९० दिवसांसाठी स्थगित केले आहे. पण, तरीही १० टक्के आयात शुल्क कायम आहे. या ९० दिवसांच्या स्थगितीतून चीनला वगळण्यात आले आहे. चीनवर सध्या सर्वाधिक १४५ टक्के शुल्क आकारले जात आहे. कराराचा पहिला भाग सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यासाठी भारताने अमेरिकेशी वाटाघाटी वेगवान केल्या आहेत. त्यांना २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार १९० अब्ज डॉलर्सवरून ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत दुप्पट करायचा आहे. व्यापार करारामुळे अल्फाबेट आणि अॅपल सारख्या अमेरिकन कंपन्यांना अमेरिकेत निर्यात करण्यासाठी भारतात उत्पादने बनवणे अधिक आकर्षक होईल.

भारतात स्मार्टफोनवर किती कर आकारला जातो?
डिक्सन आणि फॉक्सकॉन भारतात दरमहा ४३,०००-४५,००० पिक्सेल स्मार्टफोन बनवत आहेत. पण, फक्त स्थानिक बाजारपेठेसाठी. आयात शुल्काचा प्रभाव कमी करण्यासाठी कंपनी भारतात त्यांचे उत्पादन घेते. दुसरं म्हणजे त्यांचे स्मार्टफोन आयफोन्स आणि सॅमसंगच्या प्रीमियम गॅलेक्सी मॉडेल्सशी स्पर्धात्मक बनवायचे होते. भारत स्मार्टफोनवर एकूण १६.५ टक्के आयात शुल्क आकारतो. भारतात उत्पादित होणाऱ्या पिक्सेलपैकी सुमारे ६५-७० टक्के उत्पादन स्वदेशी डिक्सन करते, ज्यामध्ये नवीन मॉडेल्सचा समावेश आहे, तर फॉक्सकॉन जुन्या मॉडेल्सवर अधिक लक्ष केंद्रित करते. गेल्या ऑगस्टमध्ये तामिळनाडूतील त्यांच्या युनिटमध्ये भारतात पिक्सेल उत्पादन सुरू करणारी फॉक्सकॉन ही पहिली कंपनी होती. डिक्सनने डिसेंबरमध्ये तैवानच्या कॉम्पल इलेक्ट्रॉनिक्ससोबत भागीदारी करून त्यांच्या नोएडा प्लांटमध्ये पिक्सेल उत्पादन सुरू केले.

वाचा - व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?

चीनवरील अवलंबित्व कमी करण्याचा गुगलचे धोरण
अल्फाबेटने भारताला पिक्सेल स्मार्टफोनसाठी जागतिक उत्पादन केंद्र बनवण्याची योजना आखली होती. दोनतीन वर्षात ही योजना सत्यात उतरवण्याचा कंपनीचा मानस होता. पण, जागतिक पुरवठ्यातील तणाव, ट्रम्प यांचे टॅरिफ धोरण यामुळे कंपनीला अंतिम मुदत पुढे ढकलावी लागली. भारताव्यतिरिक्त, पिक्सेल स्मार्टफोन व्हिएतनाम आणि चीनमध्ये देखील तयार केले जातात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनवरील जोखीम आणि अवलंबित्व कमी करण्यासाठी गुगलने २०२३ मध्ये फॉक्सकॉन आणि कॉम्पलद्वारे व्हिएतनाममध्ये पिक्सेलचे उत्पादन सुरू करेल. गेल्या वर्षी जवळजवळ निम्मे प्रीमियम मॉडेल्स व्हिएतनाममध्ये तयार झाले आहेत.

Web Title: Will Trump's tariffs hit American companies after apple india will become googles production hub

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.