Lokmat Money > बिझनेस न्यूज > दिवाळीत Cash मध्ये केवळ 'इतकं'च खरेदी करू शकता Gold; जास्त घेतल्यास द्यावी लागेल 'ही' माहिती

दिवाळीत Cash मध्ये केवळ 'इतकं'च खरेदी करू शकता Gold; जास्त घेतल्यास द्यावी लागेल 'ही' माहिती

Gold Purchase in Cash: सोने-चांदी खरेदीला मर्यादा आहे. त्या मर्यादेपेक्षा अधिक खरेदीसाठी सरकारला काही तपशील द्यावा लागतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 03:33 PM2024-10-23T15:33:26+5:302024-10-23T15:34:42+5:30

Gold Purchase in Cash: सोने-चांदी खरेदीला मर्यादा आहे. त्या मर्यादेपेक्षा अधिक खरेदीसाठी सरकारला काही तपशील द्यावा लागतो.

You can only buy Gold upto 2 lakhs in Cash during Diwali If you take more you income tax wil fine check important imformation | दिवाळीत Cash मध्ये केवळ 'इतकं'च खरेदी करू शकता Gold; जास्त घेतल्यास द्यावी लागेल 'ही' माहिती

दिवाळीत Cash मध्ये केवळ 'इतकं'च खरेदी करू शकता Gold; जास्त घेतल्यास द्यावी लागेल 'ही' माहिती

Gold Purchase in Cash: दिवाळी किंवा लग्नसराईच्या काळात देशात सोन्या-चांदीचा खप वाढतो. सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीची दुकाने अतिशय आकर्षक पद्धतीने सजवली जातात, तर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर्सही दिल्या जातात. धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी सोनं खरेदी केल्यास घरात लक्ष्मी येते आणि समृद्धी राहते, अशी मान्यता आहे. त्याचबरोबर पारंपारिक परंपरेनुसार भारतात लोक लग्नातदेखील सोनं खरेदी करतात.

मात्र, सोने-चांदी खरेदीला मर्यादा आहे. त्या मर्यादेपेक्षा अधिक खरेदीसाठी सरकारला काही तपशील द्यावा लागतो. काळा पैसा शोधण्यासाठी सरकारनं हा नियम लागू केला आहे. अशा तऱ्हेने विशेषत: रोकड वापरताना सोने-चांदीच्या व्यवहाराशी संबंधित नियमांची माहिती असणं गरजेचं आहे.

... तर हा तपशील द्यावा लागेल

जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्राला प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट (पीएमएलए) २००२ अंतर्गत आणून सरकारनं रोखीनं सोनं खरेदीचे नियम कडक केले आहेत. सरकारनं सर्व सराफांना केवायसी नियमांचे पालन करणं बंधनकारक केलंय. अशा परिस्थितीत जर तुम्ही सोन्याच्या खरेदीसाठी ठराविक मर्यादेपेक्षा जास्त रोखीनं व्यवहार करत असाल तर तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्डची माहिती द्यावी लागेल. याशिवाय १० लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारांची माहिती सरकारला द्यावी लागणार आहे.

रोख खरेदीवर किती लिमिट?

याशिवाय, इन्कम टॅक्स विभागानं रोखीनं सोनं खरेदीचे नियम अधिक कडक केले आहेत, ज्यात ठराविक मर्यादेपेक्षा जास्त रोख रक्कम काढण्यावर टीडीएस आणि एका दिवसात व्यक्तींमध्ये जास्तीत जास्त रोख व्यवहारांवर निर्बंध यांचा समावेश आहे. प्राप्तिकर कायद्याच्या कलम २६९ एसटी अंतर्गत तुम्ही एका दिवसात फक्त २ लाख रुपयांपर्यंतच्या सोन्यासाठी रोखीनं व्यवहार करू शकता. आयकर कायद्याच्या कलम २७१ डी अन्वये यापेक्षा अधिक रकमेचा रोख व्यवहार केल्यास त्या रकमेइतका दंडही ठोठावला जाऊ शकतो.

Web Title: You can only buy Gold upto 2 lakhs in Cash during Diwali If you take more you income tax wil fine check important imformation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.