Lokmat Money > बिझनेस न्यूज > CNG पंप सुरु करू शकता? महिन्याला लाखो कमावण्याची संधी; जाणून घ्या काय काय लागेल...

CNG पंप सुरु करू शकता? महिन्याला लाखो कमावण्याची संधी; जाणून घ्या काय काय लागेल...

how to open CNG Pump, What need? महाराष्ट्रात गेल, ओएनजीसी, एचपीसीएल, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन सारख्या कंपन्या सीएनजी पंप उभारण्य़ाची संधी देतात. या कंपन्यांना सीएनजी पंपांच्या संख्येचा विस्तार करायचा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 05:19 PM2021-08-08T17:19:15+5:302021-08-08T17:21:07+5:30

how to open CNG Pump, What need? महाराष्ट्रात गेल, ओएनजीसी, एचपीसीएल, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन सारख्या कंपन्या सीएनजी पंप उभारण्य़ाची संधी देतात. या कंपन्यांना सीएनजी पंपांच्या संख्येचा विस्तार करायचा आहे.

you Can start a CNG pump? The opportunity to make a big profit; Find out what it takes ... | CNG पंप सुरु करू शकता? महिन्याला लाखो कमावण्याची संधी; जाणून घ्या काय काय लागेल...

CNG पंप सुरु करू शकता? महिन्याला लाखो कमावण्याची संधी; जाणून घ्या काय काय लागेल...

Business opportunities - जर तुम्हाला तुमचा स्वत:चा व्यवसाय सुरु करायचा असेल आणि पुरेसे भांडवल असेल तर तुमच्यासाठी सीएनजी पंप टाकण्याची प्रक्रिया कशी असेल याची माहिती आम्ही देत आहोत. पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढल्याने ग्राहक सीएनजी पर्यायाकडे वळू लागले आहेत. महत्वाचे म्हणजे सध्या जे शहरातील पेट्रोल पंप आहेत, त्यांच्याकडे सीएनजी सुविधा उपलब्ध करण्यासाठी पुरेशी जागा नाहीय. यामुळे जर तुमच्याकडे जागा असेल तर कंपन्या शोधात आहेत. (how to open CNG Pump and earn money.)

महाराष्ट्रात गेल, ओएनजीसी, एचपीसीएल, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन सारख्या कंपन्या सीएनजी पंप उभारण्य़ाची संधी देतात. या कंपन्यांना सीएनजी पंपांच्या  (CNG Pump) संख्येचा विस्तार करायचा आहे. यामुळे तुम्ही CNG स्टेशन (CNG Station) उघडून चांगले पैसे कमाऊ शकणार आहात. महिन्य़ाला लाखो रुपय़े कमाई करण्याची संधी आहे. चला तर पाहू, काय काय लागेल. 

काय असतात अटी....
सीएनजी पंप टाकायचा झाला तर तुम्हाला आधी जागेची गरज लागणार आहे. ज्याचाकडे 400 ते 1225 स्क्वेअर फूटांची जमीन आहे ते यासाठी योग्य आहेत. हा प्लॉट मेन रोड टच असायला हवा. जसे की, हायवे, शहरातील मुख्य रस्ता आदी. शहरात या जमिनीची रुंदी (आतमध्ये) 20 मीटर, हायवे किंवा राज्य मार्ग असेल तर 35 मीटर असायला हवी. यासाठी तुम्ही जमीन भाडेकरारावर पण घेऊ शकता. 

फक्त तुम्हाला त्या जमीन मालकाची एनओसी घ्यावी लागेल, तसेच त्याच्यासोबत अॅग्रीमेंट बनवावे लागेल. अर्जदाराचे वय 21 ते 60 वर्षे असावे. माल उचलण्यासाठी पुरेशा एफडी, बँक बॅलन्स असायला हवा. तसेच जागा मोक्याची असल्यास उत्तम. वीजेची सोय असावी. 

कंपन्यांकडे अर्ज करताना तुम्हाला काही शपथपत्रे, संपत्तीचे विवरण आदी गोष्टी द्याव्या लागतात. यानंतरच कंपनी तुमच्या जागेची पाहणी, अर्जाची छाणणी आदी करते आणि निवड करते. 

Web Title: you Can start a CNG pump? The opportunity to make a big profit; Find out what it takes ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.