शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
2
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
3
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
4
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान
5
अमित शाहांच्या भेटीवेळी चेहऱ्यावर नाराजी, व्हायरल होत असलेल्या फोटोबाबत एकनाथ शिंदे म्हणाले...  
6
'कोणतीही कारवाई करू नका'; जामा मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला निर्देश
7
F&O मध्ये ४५ नवे स्टॉक्स : Paytm, जिओ, फायनान्शिअल, LIC; Yes Bank सारख्या शेअर्सची एन्ट्री, काय फरक पडणार?
8
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
9
गोंदियात भीषण अपघात! शिवशाही बस उलटली, ११ जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
10
हळद लागली! शोभिता धुलिपालाला लागली चैतन्यच्या नावाची हळद, समोर आले प्री वेडिंगचे फोटो
11
Maharashtra News: भाजपला एकनाथ शिंदेंच हवेत उपमुख्यमंत्री, काय आहे कारण?
12
मिशन 2025! बिहार काबीज करण्यासाठी सीएम नितीश कुमारांनी आखली खास योजना
13
शेअर बाजाराच्या नावावर हायप्रोफाईल फसवणूक! गृहमंत्रालयापर्यंत पोहोचलं प्रकरण, साडेसात कोटींचा गंडा
14
Srishti Tuli : "मी गळफास घेत आहे"; महिला पायलटने आत्महत्येआधी बॉयफ्रेंडला केलेला Video कॉल
15
PMJAY-Scam : पंतप्रधान जन आरोग्य योजनेत मोठी फसवणूक! पैसे कमावण्यासाठी १८ वर्षाच्या मुलाची अँजिओप्लास्टी!
16
महत्त्वाच्या खात्यांसाठी महायुतीत लॉबिंग; शिंदेसेना, अजित पवारांना कुठली खाती हवीत?
17
माझी होणारी 'होम मिनिस्टर'! 'देवमाणूस' फेम किरण गायकवाड 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात; दिली कबुली
18
नाना पटोले संघाचे हस्तक, त्यांना RSS मध्येच पाठवा, काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराचा गंभीर आरोप  
19
Raj Kundra BREAKING: राज कुंद्राच्या घरी ईडीचे धाडसत्र, कार्यालयातही झाडाझडती
20
भांडुपच्या शाळेत बदलापूरची पुनरावृत्ती! शाळेच्या तळघरात तीन मुलींची विनयभंग, आरोपीला अटक

‘पैशाचं’ कॅलेंडर आहे तुमच्याकडे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 5:35 PM

घरात लावा हे कॅलेंडर आणि आपला पैसा वाढताना बघा..

ठळक मुद्देपैसा वाढवायचा, साठवायचा आणि भविष्यकाळासाठी त्याचा उपयोग करण्यासाठी आर्थिक कॅलेंडर ही पहिली पायरी आहे.एकदा पैसा कसा येतो आणि कसा जातो हे कळलं की मग तो कसा वाचवायचा आणि वाढवायचा, हे कळायला लागतं.तपासा, निदान पहिल्या पायरीवर तरी आपण आहोत की नाहीत?

- मयूर पठाडेतुमचं वय काय? म्हणजे तुमच्या वयाशी तसं आम्हाला ‘कर्तव्य’ नाही, पण तुम्ही काय करता? तुमचं शिक्षण चालू आहे, काही कामधाम करता कि काही उद्योग? खरंतर त्याच्याशीही आम्हाला काहीच कर्तव्य नाही. तुम्ही काही कमवत असा किंवा नसा, पण तुमच्या खर्चाचं आणि कमाईचं कॅलेंडर तुम्ही बनवता की नाही हे फार महत्त्वाचं आहे. तुमच्या या कॅलेंडरनं आमचा काहीच फायदा नाही, पण हे कॅलेंडर जर तुम्ही बनवलं, त्या पद्धतीनं आपल्या येणाºया आणि जाणाºया पैशांचं काटेकोर नियोजन केलंत, त्याचा हिशेब ठेवलात, तर भविष्यात तुमचा खिसा गरम राहाण्याचीच शक्यता अधिक आहे.अनेकांना वाटतं, आपण कमवत काहीच नाही किंवा कमाईच इतकी तुटपुंजी आहे, काही शिल्लकच राहात नाही, तर त्याचं नियोजन आणि प्लॅनिंग तरी काय करायचं?..पण खरं म्हणजे याच काळात, म्हणजे ज्यावेळी तुमची मिळकत कमीत कमी किंवा काहीच नसते, त्याच काळात तुम्ही स्वत:ला आर्थिक शिस्त लावली, तर तुमच्या भविष्यासाठी त्याचा खूपच उपयोग होऊ शकतो. अर्थविषयक तज्ञांनी तर प्रत्येकानं स्वत:चं आर्थिक कॅलेंडर तयार करायलाचं हवं असा कळकळीचा सल्ला दिला आहे. प्रत्येक गोष्टीवर आपला किती खर्च होतो, समजा काही अतिरिक्त खर्च होत असेल तर त्याला आळा कसा घालायचा, कितीही कमी मिळकत असली तरी बचत कशी करायची, हे त्यातून कळतं. पैसा वाढवायचा, साठवायचा आणि भविष्यकाळासाठी, महत्त्वाच्या गोष्टींसाठी त्याचा उपयोग करण्यासाठी आर्थिक कॅलेंडर ही पहिली पायरी आहे. एकदा पैसा कसा येतो आणि कसा जातो हे कळलं की मग तो कसा वाचवायचा आणि वाचलेल्या या पैशांतूनच तो कसा वाढवायचा, हे कळायला लागतं. त्यामुळे निदान या पहिल्या पायरीवर तरी आपण आहोत की नाहीत हे अगोदर तपासा, म्हणजे मग पुढच्या पायरीवर कसं जायचं तेही पाहता येईल..