शहरं
Join us  
Trending Stories
1
"जनतेचा ५ महिन्यात कौल बदलला त्याला काय करणार"; बाबा आढावांच्या भेटीनंतर अजितदादांचा सवाल
2
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
3
ट्रकमध्ये पैसे, ३६ नोटा मोजण्याच्या मशीन्स; भारतातील सर्वात मोठ्या IT छाप्यात काय सापडलं?
4
काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत!
5
ना बिग बी, ना सलमान-विराट, हा अभिनेता भरतो सर्वात जास्त टॅक्स, टॉप ५मधून अक्षय कुमार बाहेर
6
निकालाबाबत शंका, इव्हीएमवर संशय, राज्यातील या पराभूत उमेदवारांनी EVM पडताळणीसाठी केला अर्ज 
7
महायुतीत बंडखोरी करणाऱ्या समीर भुजबळांची राजकीय दिशा काय?; छगन भुजबळ म्हणाले..
8
“लाडकी बहीण योजना नाही, ‘ती’ ७६ लाख मते महायुतीच्या विजयाची शिल्पकार”; संजय राऊतांचा दावा
9
"अपमान सहन केला जाणार नाही"; किरीट सोमय्यांची भाई जगतापांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
फ्युचर अँड ऑप्शन्स ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, NSE नं केला मोठा बदल
11
IND vs PAK मॅचमधील भारतीय कॅप्टन अन् युधजीत यांनी घेतलेला मस्त रिले कॅच एकदा बघाच (VIDEO)
12
२०० रुपयांसाठी देशासोबत विश्वासघात! पाकिस्तानी गुप्तहेराला माहिती पुरवणाऱ्या मजुराला गुजरातमधून अटक
13
ICC Champions Trophy 2025 : जर हट्ट सोडला नाही तर PCB ला बसेल मोठा फटका; BCCI च्या मनासारखं होणार?
14
₹१८० वर जाणार TATA चा 'हा' शेअर, आताही २२% स्वस्त; LIC कडे आहेत ९५ कोटी शेअर्स 
15
Video - कष्टाचं फळ! मजूर झाला डॉक्टर; दिवसा रोजंदारीवर काम अन् रात्री खूप अभ्यास
16
शुक्र-चंद्र योग: १० राशींना झटपट लाभ, विशेष कृपा; सुख-समृद्धी वृद्धी, पद-पैसा-प्रतिष्ठा लाभ!
17
विधानसभेच्या मतदानाआधीच काँग्रेसला लागली होती पराभवाची कुणकूण? तो अंतर्गत सर्व्हे चर्चेत
18
तरुणाला वारंवार भेटायची विवाहित महिला, मुलाच्या आईने खडसावताच संतापली आणि...
19
वर्षभरात दिलाय ३३ टक्क्यांपर्यंत रिटर्न, कोणत्या Mutual Fund नं दिले बेस्ट रिटर्न्स, कोणती आहेत सेक्टर्स?
20
स्वप्नील जोशीने दिली 'मुंबई पुणे मुंबई ४' ची हिंट? मुक्ता बर्वेला टॅग करत म्हणाला...

नेमके कशाला म्हणावे आपण क्षुल्लक आणि काय असते ते किरकोळ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 5:13 PM

काही गोष्टी आपल्याला क्षुल्लक वाटतात, पण त्यांनी ठरवलंच आपल्याला त्रास द्यायचं तर परीक्षा अटळ

मिलिंद कल्याणकर

 

क्षुल्लक गोष्टी. यातील हा क्षुल्लक हा शब्द खरोखरच क्षुल्लक आहे. लहान, थोडे, कमी दर्जाचे किंवा सटर फटर अथवा ज्याची गरज नगण्य आहे अश्या गोष्टी या सदरात मोडतात. कधी कधी या गोष्टीही कधीतरी अत्यावश्यक वाटतात. काहीजण या गोष्टींना किरकोळ या शब्दानेही संबोधतात. त्यांच्या मते या गोष्टींकडे दुर्लक्ष केले तरी फरक पडत नाही. क्षुल्लक या शब्दाला कुठच्याच विशेषणांची गरज अथवा कुठच्याच शाब्दिक कुबड्याचा आधार न घेता   अर्थवाही असूनही खूपच निरु पद्रवी आहे.  क्षुल्लक तसेच सटर फटर वाटणार्‍या गोष्टीही कधी कधी स्वतर्‍चे अस्तित्व दाखवून देतात.

 

कधी कधी कामाच्या ठिकाणी आपण कोणालातरी पेन देतो व ते परत यावे म्हणून पेनाचे टोपण आपल्याकडे ठेवतो. नेहमीप्रमाणे तो ही विसरतो आपणही विसरतो. पण संध्याकाळी घरी जातांना आपल्याला या गोष्टीची आठवण येते व गोष्ट क्षुल्लक असूनही आपल्याला चुटपुट लागून राहते. टोपणाचा काहीच उपयोग नसतो. पेन परत मिळेल या आशेवर असल्यामुळे टोपण टाकूनही द्यावेसे वाटत नाही. मग ती टोपण नावाची सटर फटर वस्तू सांभाळत बसावी लागते.  पेन मागणे प्रशस्त वाटत नाही. पेन घेणारी व्यक्ती समोर असूनही भिडस्त स्वभावामुळे पेन मागता येत नाही. या क्षुल्लक गोष्टी मनाला फार लागून राहतात. काही दिवसांनी आपण विसरूनही जातो.

काही गोष्टी अशाच क्षुल्लक व किरकोळ असतात पण त्या मनाला क्षणिक त्रास  देऊन जातात. बिछान्यावर पडून पुस्तक वाचत असतांना कधी कधी हातातून पुस्तक निसटते. त्या पुस्तक निसटण्याचा त्रास नसतो पण वाचत असलेले पुस्तकाचे पान लवकर सापडत नाही कारण पुस्तक पडल्यावर ते मिटून पडलेले असल्यामुळे पाहिजे ते पान लवकर सापडत नाही.

 नवीन कोरा बनियन घातला की चहा सांडतो. मग उठून बनियनवर डाग राहू नये म्हणून पाणी लावले जाते.  पण तेव्हढ्यात चहा पिण्याचा मूड गेलेला असतो. मग मनात नसतांनाही तो राहिलेला चहा प्यावा लागतो. क्षुल्लक गोष्टींना महत्वही तसे कमीच द्यायचे असते. आईने / पत्नीने धान्य दळून आणण्यासाठी पिठाच्या गिरणीवर जाण्यास सांगणे.  वास्तविक ही गोष्ट क्षुल्लक आहे. पण त्याचे फार दूरगामी परिणाम असू शकतात. त्याच दिवशी आपण इस्त्नी करून आणलेली गडद काळ्या रंगाची पॅन्ट घातलेली असते. दळण आणताना त्या पिठाचे ठसे पॅन्टवर ठिकठिकाणी उमटलेले दिसतात.  पिठाचे ठसे काळ्या रंगावर उठून दिसतात. हातातील पिठाच्या पिशवीमुळे पॅन्टवरील पिठाचे डाग टिचकीने झाडताना हाताला लागलेले पीठ पुन्हा पॅन्टला लागते. तशी गोष्ट क्षुल्लक पण मनाला ताप देणारी. घरी आमरस केलेला असतांना खाता खाता कधी तरी पांढर्या शुभ्र लेंग्यावर तो आमरस आपली ओळख मुद्रा ठेवतो.

आंघोळ करतांना साबण हातातून निसटून लांब जाऊन पडणे अथवा बादलीमागे लपला जाणे ही गोष्ट तर प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत घडत असावी. आपण हताश होऊन साबण शोधून काढतो व स्नानाचे कार्य चालू ठेवतो.  खड्ड्यात साठलेल्या पावसाच्या पाण्यात चुकून पाय पडतो. तसे पाहण्यास गेले तर ही गोष्ट किरकोळ / क्षुल्लक आहे पण पाण्याने थबथबलेली चप्पल घालून चालणे हा अनुभव खूप जणांनी घेतला असेल.

 आपण पेरू किंवा डाळिंब खाताना त्या फळाची बी आपल्या दातात जाऊन रु तते. ती रु तलेली बी आपल्याला क्षणाक्षणाला आठवण करून देत असते. तसे पाहावयास गेले तर बी दातात अडकणे ही क्षुल्लक गोष्ट आहे. पण हीच बी आपल्याला काहीही सुचू देत नाही. एकदा ती निघाली की आपोआपच आपल्या तोंडातून सुटकेचा निर्‍श्वास बाहेर पडतो.  तसेच जेवतांना वरण-भात कालवल्यावर त्यावर लिंबू घेऊन ते पिळण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो पण  वरण-भात कालवल्यामुळे हात ओला झालेला असतो त्यामुळे लिंबू आपल्या हातून सारखे निसटते व नंतर प्रयत्न करून कसेबसे पिळतो अथवा नाद सोडून देतो.  किती क्षुल्लक गोष्ट आहे पण आपली परीक्षा बघत असते.  आपल्याला शिंक येणे हा सुद्धा असाच प्रकार आहे.  क्षुल्लक गोष्ट म्हणून आपण त्याकडे एव्हढे लक्ष देत नाही. पण शिंक येतांना आपल्या समोर उभे राहून कोणी बोलले अथवा हसले तरी येणारी शिंक बाहेर पडत नाही.  ती शिंक बाहेर पडेपर्यंत जी अवस्था होते त्या परिस्थितीचा अनुभव सगळ्यांनीच घेतला असणार. ज्या ठिकाणी आपल्याच पाठीवर आपलाच हात पोहोचणार नाही त्याजागी आलेली खाज.  वास्तविक खाज ही काही मोठी गोष्ट नाही. पण खाजविता येत नाही. कधी कधी  पॅन्टच्या तळटिपेचे एक-दोन टाके उसविलेले असतात तेव्हा आपण त्याकडे लक्ष देत नाही कारण तो प्रकार आपल्याला क्षुल्लक वाटतो. पण पॅन्ट घालतांना पायाचा अंगठा जेव्हा त्याच्यात अडकून आपला तोल जातो तेव्हा आपण स्वत:वरच चरफडतो.

शेवटी एव्हढेच म्हणता येईल की गोष्ट कितीही क्षुल्लक असली तरी ती आपली परीक्षा बघणारी असू शकते. त्यामुळे कुणाला नी काय क्षुल्लक म्हणायचे, कुणास ठाऊक!