ECIS Medical College Jobs: ईएसआयसी मेडिकल कॉलेजमध्ये नोकरी, सॅलरी 1.77 लाखपर्यंत...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 07:28 PM2021-08-11T19:28:15+5:302021-08-11T19:33:21+5:30

ECIS Medical College Jobs: ईएसआयसी मेडिकल कॉलेज भरती 2021 पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.

ECIS Medical College Jobs: Jobs in ESIC Medical College, Salary up to 1.77 lakh ... | ECIS Medical College Jobs: ईएसआयसी मेडिकल कॉलेजमध्ये नोकरी, सॅलरी 1.77 लाखपर्यंत...

ECIS Medical College Jobs: ईएसआयसी मेडिकल कॉलेजमध्ये नोकरी, सॅलरी 1.77 लाखपर्यंत...

Next

ECIS Medical College Jobs : नवी दिल्ली : एम्प्लाइज स्टेट इंश्युरन्स कॉर्पोरेशन मेडिकल कॉलेज, हैदराबादने प्राध्यापक, तज्ज्ञ, वरिष्ठ निवासी आणि कनिष्ठ निवासी या पदांसाठी भरती होणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2021 आहे. एकूण 237 रिक्त पदे भरली जाणार आहेत. ईएसआयसी मेडिकल कॉलेज भरती 2021 पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.

उमेदवारांना त्यांचा अर्ज शॉर्टलिस्ट केल्यानंतर मुलाखतीसाठी बोलावले जाईल. ईएसआयसी भरती 2021 बद्दल अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट www.esic.nic ला भेट देऊ शकता. या पदांसाठी एमबीबीएस पदवीशी संबंधित स्पेशालिटीमध्ये पीजी किंवा डिप्लोमा पदवीची मागणी करण्यात आली आहे.

ईएसआयसी भरती 2021, हैदराबाद पदांसाठी सॅलरी
प्राध्यापक- 101000 - 177000/- दरमहा
सुपर स्पेशालिस्ट- 60000-112000/-दरमहा
वरिष्ठ निवासी - 101000/- दरमहा
कनिष्ठ निवासी -  85000/- दरमहा


एकूण रिक्त पदे...
प्राध्यापक- 53 पदे
सुपर स्पेशालिटी- 15 पदे
सल्लागार 06 पदे
वरिष्ठ निवासी- 124 पदे
कनिष्ठ  निवासी- 36 पदे

कमाल वयोमर्यादा
प्राध्यापक - 69 वर्षे
सुपर स्पेशालिस्ट - 66 वर्षे
सल्लागार- 66 वर्षे
वरिष्ठ निवासी - 45 वर्षे
शिक्षक- 37 वर्षे
कनिष्ठ रहिवासी- 30 वर्षे

आवश्यक शैक्षणिक योग्यता
सुपर स्पेशालिस्ट - एमबीबीएससह सुपर स्पेशालिटीमध्ये पीजी
सल्लागार - एमबीबीएस पदवीशी संबंधित पीजी किंवा डिप्लोमा इन स्पेशालिटी
वरिष्ठ निवासी - पीजी पदवी किंवा डिप्लोमा
कनिष्ठ निवासी - एमबीबीएस पदवी

Web Title: ECIS Medical College Jobs: Jobs in ESIC Medical College, Salary up to 1.77 lakh ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.