मुंबई : कर्मचारी राज्य बीमा निगम (ESIC) मध्ये ६ हजार ५०० हून अधिक पदांवर जम्बो व्हेकन्सी (Vacancy 2021) आहे. बारावी उत्तीर्ण उमेदवारांपासून कोणत्याही विषयातील पदवीधरांपर्यंत तरुणांसाठी भारत सरकारची (Govt Jobs) नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. ही भरती ग्रुप सी च्या पदांवर केली जाईल. पे-स्केल ८१ हजार रुपये प्रति महिना आहे. (esic recruitment 2021 upper division clerk stenographer jobs know how to apply)
अपर डिवीजन क्लर्क (ESIC UDC) ते स्टेनोग्राफर (ESIC Stenographer) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. केंद्र सरकारने भारताच्या राजपत्रात यासंबंधीचे नोटिफिकेशन निघाले आहे. ईएसआयसी अपर डिवीजन क्लर्क पदांसाठी ऑनलाइन चाचणीच्या आधारे निवड केली जाईल. ईएसआईसी स्टेनोग्राफरसाठी टायपिंग टेस्ट होईल.
Saraswat Bank Recruitment 2021: कॉमर्स पदवीधारकांना उत्तम संधी; सारस्वत बँकेत क्लर्क पदावर मोठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
ESIC UDC साठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवीधर असणे अनिवार्य आहे. ESIC Stenographer या पदासाठी मान्यता प्राप्त बोर्डातून कोणत्याही विषयासह बारावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. स्टेनोग्राफरसाठी उमेदवारांचा हिंदी आणि इंग्रजी टाइपिंग स्पीड ८० शब्द प्रति मिनिट असावा. सर्व पदांसाठी उमेदवारांचा किमान वय १८ वर्षे तर कमाल वय २७ वर्षे असावे. आरक्षित वर्गांसाठी कमाल वयोमर्यादेत सवलत मिळेल.
पदांची माहिती आणि पे स्केल
अपर डिवीजन क्लर्क (UDC)/ अपर डिवीजन क्लर्क कॅशियरची ६,३०६ पदे, स्टेनोग्राफरची २४६ पदे, अशी एकूण ६५५२ पदे भरण्यात येणार आहेत. तर, यासाठी पे स्केल २५,५०० रुपये ते ८१,१०० रुपये प्रति महिनापर्यंत मिळू शकेल. या वेतन श्रेणीत टीए, डीए सह अन्य भत्ते जोडून वेतन मिळेल. लवकरच ईएसआईसी ची वेबसाइट esic.nic.in वर या व्हेकन्सीसाठी अर्जांची माहिती दिली जाईल.