Job Alert: MBA, इंजिनिअर, वकील, BA पदवीधरांसाठी गेलमध्ये नोकरीची संधी; असा करा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 10:17 AM2021-07-08T10:17:34+5:302021-07-08T10:20:00+5:30

GAIL Recruitment 2021 for graduates on others: गेलद्वारे बुधवारी, ७ जुलै २०२१ नोकर भरतीबाबत नोटिफिकेशन काढण्यात आले. यानुसार मेकॅनिकल, मार्केटिंग, एरआर, सिव्हिल, कायदे, राजभाषा आदी विभागांवर मॅनेजर, सिनिअर इंजिनिअर, सिनिअर ऑफिसर आणि ऑफिसर पदांसाठी योग्य उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. 

GAIL Recruitment 2021: Job opportunities in GAIL for MBA, Engineer, Lawyer, BA pass candidates; 220 vacancies | Job Alert: MBA, इंजिनिअर, वकील, BA पदवीधरांसाठी गेलमध्ये नोकरीची संधी; असा करा अर्ज

Job Alert: MBA, इंजिनिअर, वकील, BA पदवीधरांसाठी गेलमध्ये नोकरीची संधी; असा करा अर्ज

Next

GAIL Recruitment 2021: गेलमध्ये सरकारीनोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सरकारीनोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी दिलासा देणारी भरती आयोजित करण्यात आली आहे. देशाची महारत्न कंपन्यांपैकी एक गेल (इंडिया) लिमिटेडने (GAIL India) विविध विभागांमध्ये एकूण २२० जागांवर अर्ज मागविले आहेत. यामध्ये इंजिनिअर, वकील, मार्केटिंग, एचआर आदी पदे भरण्यात येणार आहेत. (GAIL recruitment 2021 for graduates, others; 220 vacancies to be filled.)

ITBP Job Alert: आयटीबीपी कॉन्स्टेबल पद भरतीची लिंक आजपासून सुरु होणार, जाणून घ्या...

गेलद्वारे बुधवारी, ७ जुलै २०२१ नोकर भरतीबाबत नोटिफिकेशन काढण्यात आले. यानुसार मेकॅनिकल, मार्केटिंग, एरआर, सिव्हिल, कायदे, राजभाषा आदी विभागांवर मॅनेजर, सिनिअर इंजिनिअर, सिनिअर ऑफिसर आणि ऑफिसर पदांसाठी योग्य उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. 

BE/BTech उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; नौदलात अर्ज करण्याची लिंक खुली झाली, लाखावर पगार

इच्छुक उमेदवार गेल (इंडिया) लिमिटेडच्या अधिकृत वेबसाईटवर gailonline.com नोकरीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची मुदत बुधवारपासून सुरु झाली आहे. शेवटची तारीख ५ ऑगस्ट २०२१ आहे. उमेदवारांना २०० रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे. हे शुल्क अर्ज करताना ऑनलाईन भरता येणार आहे. एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी अर्ज शुल्क नाहीय. 

GAIL Recruitment 2021 भरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

GAIL Recruitment 2021 अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा...

या पदांवर होणार आहे भरती...
मॅनेजर (मार्केटिंग-कमोडिटी रिस्क मॅनेजमेंट): 4 पद 
मॅनेजर (मार्केटिंग इंटरनॅशनल एलएनजी आणि शिपिंग): 6 पदे
सीनियर इंजीनियर (केमिकल): 7 पदे
सीनियर इंजीनियर (मेकॅनिकल): 51 पदे
सीनियर इंजीनियर (इलेक्ट्रिकल): 26 पदे
सीनियर इंजीनियर (इंस्ट्रुमेंटेशन): 3 पदे
सीनियर इंजीनियर (सिविल): 15 पदे
सीनियर इंजीनियर (गेलटेल टीसी/टीएम): 10 पदे
सीनियर इंजीनियर (बॉयलर ऑपरेशन): 5 पदे
सीनियर इंजीनियर (पर्यावरण इंजीनियरिंग): 5 पदे
सीनियर ऑफिसर (ईअँडपी): 3 पदे
सीनियर ऑफिसर (एफ अँड एस): 10 पदे
सीनियर ऑफिसर (सी अँड पी): 10 पदे
सीनियर ऑफिसर (बीआयएस): 9 पदे
सीनियर ऑफिसर (मार्केटिंग): 8 पदे
सीनियर ऑफिसर (एचआर): 18 पदे
सीनियर ऑफिसर (कॉर्पोरेट कम्युनिकेशन): 2 पदे
सीनियर ऑफिसर (लॉ): 4 पदे
सीनियर ऑफिसर (एफ अँड ए): 5 पदे
ऑफिसर (प्रयोगशाळा): 10 पदे
ऑफिसर (सिक्युरिटी): 5 पदे
ऑफिसर (राजभाषा): 4 पदे

( GAIL (India) Limited has invited applications from graduates, engineers, CAs and others to fill 220 vacancies for manager, senior engineer, senior officer and officer posts.)

Web Title: GAIL Recruitment 2021: Job opportunities in GAIL for MBA, Engineer, Lawyer, BA pass candidates; 220 vacancies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.