नवी दिल्लीECGC PO Recruitment 2021, Sarkari Naukri 2021: एक्स्पोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनने (ईसीजीसी) प्रोबेशनरी ऑफीसर पदासाठीच्या भरतीची अधिकृत जाहीरात प्रसिद्ध केली आहे. या जाहीरातीत उमेदवाराची योग्यता, मासिक वेतन, अर्जाची फी यासह संपूर्ण माहिती दिली आहे.
इच्छुक उमेदवारांना ecgc.in या संकेतस्थळावर जाऊन फॉर्म डाऊनलोड करता येईल. प्रोबेशनरी ऑफीसर पदासाठी एकूण ५९ जागांची भरती निघाली आहे. यात २५ जागा अनारक्षित प्रवर्गातील आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना ३२,७९५ रु. ते ६२,३१५ रुपयांपर्यंत मासिक वेतन दिले जाईल. १ जानेवारीपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ३१ जानेवारी २०२१ पर्यंत इच्छुकांना अर्ज करता येणार आहे. १४ मार्च रोजी या नोकरीसाठीची ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल आणि परीक्षेचा निकाल ३१ मार्च रोजी जाहीर केला जाईल.
कोणत्याही क्षेत्रातील अर्थात कला, वाणिज्य किंवा विज्ञान क्षेत्रातील पदवीधर या नोकरीसाठी अर्ज करू शकतो. अर्जदाराचे वय २१ ते ३० वर्षांपर्यंत असणं बंधनकारक आहे. अर्ज दाखल करण्यासाठी अनारक्षित प्रवर्गासाठी ७०० रुपये शुल्क भरावे लागेल. तर आरक्षित प्रवर्गाला १२५ रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे.