नोकरीची सुवर्णसंधी! मेट्रोमध्ये विविध पदं भरली जाणार; सव्वा लाखापर्यंत पगार मिळणार
By कुणाल गवाणकर | Published: January 4, 2021 03:45 PM2021-01-04T15:45:00+5:302021-01-04T15:45:56+5:30
maharashtra government jobs 2021 mmrc: मेट्रोमध्ये विविध पदांसाठी भरती; अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
Maharashtra Metro Jobs 2021: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) मध्ये तंत्रज्ञ, अभियंत्यासह अनेक जागांसाठी भरती आहे. महाराष्ट्र मेट्रोनं यासाठी अर्ज मागवते आहेत. विविध पदांसाठी असलेली शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार अधिकृत संकेतस्थळावर (mahametro.org) जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेगवारांना २१ जानेवारी २०२१ अंतिम तारीख असेल.
Pune Metro Rail Project: पुणे मेट्रो रेल प्रोजेक्टमध्ये विविध पदांसाठी भरती आहे. त्यासाठी असलेली शैक्षणिक योग्यता वेगवेगळी आहे. यासाठी १० वी उत्तीर्णांपासून पदवीधारक अर्ज करू शकतात.
तंत्रज्ञ पदांसाठी १० वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. मात्र या उमेदवारांकडे NCVT/SCVT मान्यता प्राप्त संस्थांचं आयटीआय प्रमाणपत्र असायला हवं. तर स्टेशन नियंत्रक आणि कनिष्ठ अभियंता पदांसाठी अर्ज करताना मान्यता प्राप्त संस्थेमधून अभियांत्रिकीच्या संबंधित विषयात तीन वर्षांचा डिप्लोमा पूर्ण केलेला असावा. सेक्शन अभियंता या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारानं मान्यता प्राप्त संस्थेतून संबंधित विषयात बीई किंवा बीटेकचं शिक्षण घेतलेलं असावं.
वयोमर्यादा: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनमधील (MMRC) तंत्रज्ञ, अभियंत्यासह इतर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेगवाराचं किमान वय १८ वर्षे, तर कमाल वय २८ वर्षे असावं.
अर्ज शुल्क: या पदांसाठी अर्ज करताना जनरल आणि ओबीसी वर्गातील उमेदवारांना ४०० रुपये शुल्क भरावं लागेल. तर अन्य उमेदवारांना १५० रुपये भरावं लागेल.
कशी होणार निवड: सर्व पदांसाठी निवड करताना आधी लेखी परीक्षा होईल. त्यानंतर मुलाखत घेतली जाईल.
कसा कराल अर्ज: इच्छुक उमेदवार महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचं अधिकृत संकेतस्थळ असलेल्या mahametro.org च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करू शकतात. १४ डिसेंबर २०२० पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख २१ जानेवारी २०२१ आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.