HPCL मध्ये नोकरीची सुवर्ण संधी, कोण करू शकतं अर्ज? जाणून घ्या सविस्तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 02:17 PM2022-06-23T14:17:45+5:302022-06-23T14:19:25+5:30
HPCL Jobs 2022: इच्छुक उमेदवार एचपीसीएलच्या अधिकृत साइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 जुलै ठेवण्यात आली आहे.
नवी दिल्ली : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे (HPCL) भरती अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार एचपीसीएलद्वारे विविध पदांवर भरती केली जाणार आहे. ज्यासाठी उमेदवार आजपासून अर्ज करू शकतील. इच्छुक उमेदवार एचपीसीएलच्या अधिकृत साइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 जुलै ठेवण्यात आली आहे.
या भरती मोहिमेद्वारे मेकॅनिकल इंजीनिअर पदाच्या 103 जागा, इलेक्ट्रिकल इंजीनिअरची 42 पदे, इंस्ट्रमेंटेशन इंजीनिअरची 30 पदे, क्वालिटी कंट्रोल ऑफिसरची 27 पदे, सिव्हिल इंजीनिअरची 25 पदे, चार्टर्ड अकाउंडट्सची 5 पदे, केमिकल इंजीनिअरची 7 पदे, इन्फॉर्मेशन सिस्टम ऑफिसरची 5 पदे, लॉ ऑफिसरची 7 पदे, सिनिअर मॅनेजर इलेक्ट्रिकलची 3 पदे, वेलफेअर ऑफिसरची 2 पदे आणि सेफ्टी ऑफिसरच्या 13 पदांसाठी भरती होणार आहे.
शैक्षणिक पात्रता
या भरती मोहिमेसाठी शैक्षणिक पात्रता वेगळ्या पद्धतीने ठरविण्यात आली आहे. त्यासाठी अर्जदारांनी अधिकृत अधिसूचना तपासावी. त्याचवेळी, मेकॅनिकल इंजीनिअर, इलेक्ट्रिकल इंजीनिअर, सिव्हिल इंजीनिअर आणि केमिकल इंजीनिअर पदांच्या भरतीसाठी अर्जदाराचे वय 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे, असे म्हटले आहे.
निवड प्रक्रिया
लेखी परीक्षा, ग्रुप टास्क आणि पर्सनल इंटरव्यू इत्यादींच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
अर्जाचे शुल्क
या भरतीसाठी उमेदवारांना अर्जासोबत शुल्क भरावे लागेल. जनरल, इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना 1000 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
असा करू शकता अर्ज
या भरतीसाठी उमेदवार 23 जून ते 22 जुलै 2022 पर्यंत एचपीसीएलच्या अधिकृत वेबसाइट, hindustanpetroleum.com वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.