नवी दिल्ली : इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनने ऑफिसर ऑफिस असिस्टंट पदासाठी रिक्त जागांसाठी अधिसूचना जारी (IBPS RRB Notification 2022) केली आहे. इच्छुक असलेले आणि पात्र उमेदवार या पदांसाठी ibps.in या IBPS च्या अधिकृत साइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ७ जूनपासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ जून २०२२ आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत आठ हजारांहून अधिक पदांची भरती केली जाणार आहे.
जागांची माहिती...एकूण रिक्त जागा: ८ हजार १०६ पदेऑफिस असिस्टंट : ४ हजार ४८३ पदेऑफिसर स्केल: २ हजार ६७६ पदे
महत्वाच्या तारखा...अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: ७ जून २०२२अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ जून २०२२पूर्व परीक्षा प्रशिक्षणाचे आयोजन: १८ जुलै ते २३ जुलै २०२२पूर्वपरीक्षेची तारीख : ऑगस्ट (संभाव्य).मुख्य परीक्षा आयोजित करण्याची तारीख : सप्टेंबर/ऑक्टोबर (संभाव्य)
शैक्षणिक पात्रताया भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. याशिवाय, उमेदवाराला स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना चेक करावी.
किती भरावे लागेल शुल्क?या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी SC/ST/PWBD उमेदवारांना 175 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. इतर सर्व श्रेणींसाठी उमेदवारांना 850 रुपये भरावे लागतील. भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत साइटची मदत घेऊ शकतात.