दहावी उत्तीर्ण उमेदवारांना पोस्टात नोकरीची संधी, जाणून घ्या वेतन आणि कसा कराल अर्ज
By जयदीप दाभोळकर | Published: January 17, 2021 12:28 PM2021-01-17T12:28:04+5:302021-01-17T12:30:31+5:30
महाराष्ट्रातील तरूणांसाठी आहे सुवर्णसंधी
India Post Driver Notification 2021: भारतीय टपाल खात्यात दहावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. भारतीय टपाल खात्यानं एक नोटिफिकेशन जारी करत याबाबत माहिती दिली. १० उत्तीर्ण उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार असून स्टाफ कार ड्रायव्हर पदांसाठी ही भरती निघाली आहे. इच्छुकांना भारतीय टपाल खात्याच्या indiapost.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागणार आहे.
भारतीय टपाल खात्याच्या नोटिफिकेशनप्रमाणे स्टाफ कार ड्रायव्हर या पदांसाठी १२ जागांसाठी भरती केली जाणार आहे. यापैकी ४ पदं ओबीसी आणि प्रत्येकी १ पद एससी आणि एसटी श्रेणीतील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आलं आहे.
शैक्षणिक पात्रता
भारतीय टपाल खात्यानं या पदांसाठी १० उत्तीर्ण असल्याची अट ठेवली आहे. तसंच यासाठी संबंधित उमेदवारांकडे वाहन चालवण्याचा परवाना असणंही आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं आहे. या पदांसाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे आणि कमाल वयोमर्यादा २७ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
टपाल खात्यात या पदांसाठी अर्ज करताना उमेदवारांना कोणतंही शुल्क भरावं लागणार नाही. उमेदवारांची वाहन चालवण्याची चाचणी घेतली जाणार आहे. या चाचणीत उत्तर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची या पदासाठी निवड केली जाईल. अधिक माहितीसाठी, तसंच नोटिफिकेश पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा. उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारे अर्ज करता येणार आहे. तसंच अर्ज करण्याची अंतिम तारीख १० मार्च २०२१ निश्चित करण्यात आली आहे.
किती असेल वेतन?
या पदांवर निवड होणाऱ्या उमेदवारांना दरमहा १९,९०० रूपये वेतन दिलं जाणार आहे. तसंच उमेदवारांचं पोस्टिंगचं स्थान मुंबई हे असणार आहे.