भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीरांच्या भरतीसाठी भारतीय लष्कराने अग्निवीर रिक्रूटमेंट रॅली नोटिफिकेशन जारी केले आहे. यानुसार, पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांना भारतीय लष्कराची अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in ला भेट देऊन अर्ज करता येईल. जुलै 2022 पासून नोंदणी प्रक्रिया सुरू होईल.
या पदांसाठी होईल भरती - अग्निवीर जनरल ड्यूटीअग्निवीर टेक्निकल (एव्हिएशन/एम्यूनेशन)अग्निवीर क्लर्क/ स्टोअरकीपर टेक्निकलअग्निवीर ट्रेड्समन 10वी पासअग्निवीर ट्रेड्समन 8वी पास
किती असेल सॅलरी -जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार, 4 वर्षांसाठी उमेदवारांची भरती केली जाईल. यादरम्यान दरवर्षी 30 दिवस सुट्टीही मिळेल. सर्विसच्या पहिल्यावर्षी 30,000/- रुपये एवढे वेतन आणि भत्ते, दुसऱ्या वर्षी 33,000/- रुपये एवढे वेतन आणि भत्ते, तिसऱ्या वर्षी 36,500/- रुपये एवढे वेतन आणि भत्ते तसेच शेवटच्या आणि अखेरच्या वर्षीही 40,000/- हजार रुपये वेतन आणि भत्ते दिले जातील.
पदानुसार निर्धारित पात्रता -- जनरल ड्यूटी पदाच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना 10व्या वर्गात किमान 45 टक्के मार्क असणे आवश्यक आहे. - टेक्निकल एव्हिएशन आणि एम्यूनेशन पदासाठी फिजिक्स, केमेस्ट्री, मॅथ्स आणि इंग्रजी विषयांत किमान 50 टक्के मार्कांसह 12वी पास होणे आवश्यक आहे.- क्लर्क/ स्टोअरकीपर पदांसाठी उमेदवार कुठल्याही शाखेतून किमान 60 टक्के मार्क घेऊन 12वी पास होणे आवश्यक आहे. तसेच इंग्रजी आणि मॅथ्स मध्ये 50 टक्के मार्क असणे आवश्यक आहे.- ट्रेड्समन पदांसाठी 10वी आणि 8वी पास उमेदवारांची वेग-वेगळी भरती केली जाईल. सर्व विषयांत 33 टक्के मार्क असणे आवश्यक आहे. - सर्व पदांसाठी निर्धारित वयोमर्यादा 17.5 वर्ष ते 23 वर्ष एवढी असेल.
सर्व्हिसनंतर काय मिळणार? - चार वर्षं नोकरी पूर्ण झाल्यानंतर, अग्निवीरांना सेवा निधी पॅकेज, अग्निवीर स्किल सर्टिफिकेट आणि 12वी समकक्ष पात्रता प्रमाणपत्र देखील मिळेल. जो उमेदवार 10वी पास असेल, त्याला 4 वर्षांनंतर, 12वी समकक्ष पास सर्टिफिकेटदेखील मिळेल. यासंदर्भातील माहिती नंतर जारी केली जाईल.