Indian Navy Tradesman Recruitment 2021: भारतीय नौदलात सेवा बजावण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरूणांसाठी एक चांगली बातमी आहे. भारतीय नौदलात ट्रेड्समन मेट पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. या अंतर्गत ईस्टर्न नेव्हल कमांड, वेस्टर्न नेव्हल कमांज आणि सदर्न नेव्हल कमांडमध्ये १,१५९ पदांसाठी अर्ज मागवण्यात आलं आहेत. २२ फेब्रुवारी सकाळी १० वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. तसंच ७ मार्च संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवारांना अरज करता येतील. यामध्ये ईस्टर्न नेव्हल कमांडसाठी ७१० पदं, वेस्टर्न नेव्हल कमांडमध्ये ३२४ पदं, सदर्न नेव्हल कमांडमध्ये १२५ पदं अशा एकूण १,१५९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या अंतर्गत ज्या उमेदवारांची निवड केली जाईल त्यांना मॅट्रिक्स लेव्हल १ च्या आधारावर वेतन मिळेल. निवड झाल्यानंतर उमेदवारांना १८ हजार रूपयांपासून ५६,९०० रूपयांपर्यंत वेतन देण्यात येईल. कोण करू शकतं अर्ज?ट्रेड्समॅन मेट पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारानं कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाची हायस्कूल अथवा १० वीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असणं आवश्यक आहे. याव्यतिरिक्त आयटीआय प्रमाणपत्र असणं देखील अनिवार्य आहे. उमेदवारांचं वय १८ ते २५ वर्षांच्या मध्ये असणं आवश्यक आहे.किती असेल शुल्क?सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील विद्यार्थ्यांना २०५ रुपये शुल्क भरावं लागणार आहे. तर एससी, एसटी, पीएडब्ल्यूडी, माजी कर्मचारी आणि महिला वर्गाच्या उमेदवारांकडून कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. ट्रेड्समॅन मेट पदांच्या उमेदवारांची निवड ऑनलाईन कंप्म्युटर बेस्ड परीक्षेच्या आधारावर होणार आहे. अधिक माहितीसाठी या ठिकाणी क्लिक करा.