ITBP Job Alert: आयटीबीपी कॉन्स्टेबल पद भरतीची लिंक आजपासून सुरु होणार, जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 09:56 AM2021-07-05T09:56:49+5:302021-07-05T09:57:52+5:30
ITBP Constable Application 2021: आयटीबीपी कॉन्स्टेबल भरती २०२१ ची वाट पाहणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. इंडो तिबेट सीमा पोलीस दल (ITBP) ने क्रीडा कोट्यातून कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन नुकतेच काढले होते.
ITBP Constable Application 2021: आयटीबीपी कॉन्स्टेबल भरती २०२१ ची वाट पाहणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. इंडो तिबेट सीमा पोलीस दल (ITBP) ने क्रीडा कोट्यातून कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) पदांसाठी भरतीचे नोटिफिकेशन नुकतेच काढले होते. अधिसुचनेनुसार आयटीबीपी कॉन्स्टेबल अॅप्लिकेशन २०२१ विंडो आज ५ जुलै पासून सुरु होत आहे. (The recruitment process for selection of constables in the Indo-Tibetan Border Police (ITBP) will begin from today.)
इच्छुक उमेदवार आयटीबीपी कॉन्स्टेबल जीडी भरतीसाठी अर्ज करू शकतात. यासाठी recruitment.itbpolice.nic.in वर भेट द्यावी लागणार आहे. ऑनलाईन अर्ज आज दुपारी १ वाजल्यापासून सुरु होणार आहे. ही लिंक २ सप्टेंबर २०२१ रात्री ११.५९ वाजेपर्यंत सुरु असणार आहे.
ITBP द्वारे १२ वेगवेगळ्या खेळामध्ये प्राविण्य मिळविलेल्या एकूण ६५ जागांसाठी जनरल ड्यूटी कॉन्स्टेबल भरती केली जाणार आहे. जनरल ड्यूटी कॉन्स्टेबल ही पदे ग्रुप सी अंतर्गत येतात. ही पदे काही काळासाठी भरली जाणार आहेत. मात्र, हा काळ संपल्यानंतर आयटीबीपीने त्यांना कायम करण्यासाठी देखील तरतूद केली आहे. अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहावी.
आयटीबीपी भरतीची अधिसूचना पाहण्यासाठी इथे क्लिक करा...
BE/BTech उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; नौदलात अर्ज करण्याची लिंक खुली झाली, लाखावर पगार
Indian Navy SSC Recruitment, Sarkari Nokari 2021: इंडियन नेव्हीने SSC (IT Officer) पदांसाठी योग्य उमेदवारांकडून रिक्त जागांवर अर्ज मागविले आहेत. BE/BTech उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत. भरतीचे नोटिफिकेशन आधी जारी करण्यात आले आहे. आजपासून ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. (Join Indian Navy 2021: Apply for SSC Officer posts on joinindiannavy.gov.in)