JOB Alert : खूशखबर! Indian Oil Corporation मध्ये 12 वी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; 570 जागांसाठी भरती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 12:40 PM2022-01-31T12:40:47+5:302022-01-31T12:58:14+5:30

IOCL Apprentice Recruitment 2022 : IOCL ने गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा आणि दादरा-नगर हवेली येथे 500 हून अधिक अप्रेंटिस भरतीसाठी ही मोहीम सुरू केली आहे.

JOB Alert iocl apprentice recruitment 2022 to fill up total 570 posts eligibility criteria selection process stipend | JOB Alert : खूशखबर! Indian Oil Corporation मध्ये 12 वी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; 570 जागांसाठी भरती

JOB Alert : खूशखबर! Indian Oil Corporation मध्ये 12 वी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; 570 जागांसाठी भरती

googlenewsNext

नवी दिल्ली - इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने आयओसीएल अप्रेंटीस उमेदवारांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. आयओसीएल अप्रेंटिस भरती 2022 साठी ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार IOCL च्या अधिकृत वेबसाईट iocl.com वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. पात्र उमेदवारांची लेखी चाचणीद्वारे निवड केली जाईल.

IOCL ने गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा आणि दादरा-नगर हवेली येथे 500 हून अधिक अप्रेंटिस भरतीसाठी ही मोहीम सुरू केली आहे. पात्र उमेदवार 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अप्रेंटिस ट्रेनिंग कालावधी हा एक वर्षाचा असेल. उमेदवारांनी रिजनल डायरेक्टरेट ऑफ अप्रेंटिसशिप (RDAT) कडे ट्रेड अप्रेंटिस म्हणून ऑनलाइन नोंदणी करावी किंवा बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग (BOAT) मध्ये टेक्निशिअन अप्रेंटिस म्हणून ऑनलाइन अर्ज करावा. 

राज्यनिहाय रिक्त पदांचा तपशील

गुजरात – 121 पदे
महाराष्ट्र – 322 पदे
मध्य प्रदेश – 80 पदे
छत्तीसगड – 35 पदे
गोवा – 8 पदे
दादरा आणि नगर हवेली – 4 पदे
एकूण रिक्त पदांची संख्या – 570

IOCL भरती 2022 ची शैक्षणिक पात्रता

कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण मंडळ किंवा संस्थेतून बारावी परीक्षा उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय डिप्लोमा प्राप्त केलेले उमेदवार अर्ज करू शकतात. बीई, बीटेक, एमसीए, एलएलबी आणि इतर उच्च शैक्षणिक पदवी असलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे जाहीर केलेल्या अधिसूचनेत स्पष्टपणे म्हटले आहे.

वयोमर्यादा

पात्र अर्जदारांचे वय 31 जानेवारी 2022 रोजी किमान 18 वर्षे आणि कमाल 24 वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. अधिक तपशीलांसाठी सूचना काळजीपूर्वक वाचा.

स्टायपेंड किती?

ट्रेड आणि टेक्निशियन शिकाऊ उमेदवारांना स्टेशनरी, वाहतूक आणि विविध खर्चासाठी 2500 रुपयांच्या अतिरिक्त रकमेसह प्रशिक्षणार्थी नियमांनुसार एकत्रित स्टायपेंड दिले जाईल. एकत्रित वेतन विशिष्ट ठिकाणी लागू असलेल्या किमान वेतनामधील अद्ययावत सुधारणांच्या अधीन आहे.

निवड प्रक्रिया

अर्जदारांची लेखी चाचणी (अवधी 90 मिनिटे), कागदपत्रे पडताळणी आणि इतर पात्रता निकषांची पूर्तता या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल. लेखी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होईल ज्यामध्ये 100 ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टीपल चॉईस क्वशन (MCQ) विचारले जातील. एका हिदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: JOB Alert iocl apprentice recruitment 2022 to fill up total 570 posts eligibility criteria selection process stipend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी