Join Indian Navy recruitment 2021, Sarkari Naukri: भारतीय नौदलामध्ये भरती होण्याची सुंदर संधी आहे. इंडियन नेव्हीने (Indian Navy) नाविक एमआर (Sailor MR) पदांवर भरतीचे आयोजन केले आहे. यासाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार यासाठी ऑनलाईन अर्ज १९ जुलैपासून करू शकतात. शेवटची तारीख २३ जुलै २०२१ ही आहे. (Indian Navy Recruitment 2021 for 350 Vacancies of Sailor Posts.)
या भरतीच्या माध्यमातून नौदलामध्ये सेलर मॅट्रिक (१०वी) क्लास रिक्रुटमेंट शेफ, स्टिवॉर्ड आणि हायजिनिस्टच्या पदांसाठी एकून ३५० जागा भरल्या जाणार आहेत. योग्य पुरुष उमेदवार अधिकृत वेबसाईट joinindiannavy.gov.in वर जाऊन रिक्त पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत. अधिक माहितीसाठी इंडियन नेव्ही भरती 2021 नोटिफिकेशनची डायरेक्ट लिंक खाली देण्यात आली आहे.
कोण करू शकते अर्ज...शैक्षणिक योग्यता : इच्छुक उमेदवार भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालाद्वारे मान्यता प्राप्त बोर्डाकडून 10 वी ची परीक्षा पास हवा. वयाची अट : ज्यांचा जन्म १ एप्रिल 2001 ते ३० सप्टेंबर 2004 य़ा दोन तारखांमध्ये होतो, तेच उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. पगार किती असेल? निवड झालेल्या उमेदवारांना ट्रेनिंग घ्यावे लागणार आहे. या काळात त्यांना 14,600 रुपये स्टायपेंड दिला जाणार आहे. ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर, उमेदवारांना लेव्हल तीन नुसार 21,700 रुपये - 69,100 रुपये या स्केलने पगार दिला जाणार आहे. य़ाशिवाय त्यांना डीए (DA) व्यतिरिक्त 5200 रुपये दर महिना एमएसपी दिला जाणार आहे.
शारिरीक योग्यता...(Physical Eligibility Details)उंची : 157 सेमीरनिंग: 1.6 किमी 07 मिनिटे उठाबशा: 20 छाती : कमीतकमी 5 सेमी फुलविल्यानंतर
निवड प्रक्रिया लेखी परीक्षा आणि मैदानी परीक्षेसाठी उमेदवार हे १० वीच्या मार्कवर निवडले जाणार आहेत. कट ऑफ एका राज्या राज्यांमध्ये वेगवेगळे असू शकतात. एकूण 350 जागा आहेत, यासाठी 1750 उमेदवारांनाच परीक्षांना बोलावले जाणार आहे. नौदल भरतीसाठी या लिंकवर क्लिक करा...