'इंडियन ऑइल'मध्ये नोकरीची संधी!; कसा करायचा अर्ज? जाणून घ्या...

By मोरेश्वर येरम | Published: December 25, 2020 11:23 AM2020-12-25T11:23:41+5:302020-12-25T11:30:36+5:30

इच्छुक आणि योग्य उमेदवारांना यासाठी IOCL.com या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज दाखल करता येणार आहे.

job opportunities in Indian Oil How to apply Find out | 'इंडियन ऑइल'मध्ये नोकरीची संधी!; कसा करायचा अर्ज? जाणून घ्या...

'इंडियन ऑइल'मध्ये नोकरीची संधी!; कसा करायचा अर्ज? जाणून घ्या...

Next
ठळक मुद्देनोकरीच्या शोधात आहात? मग इंडियन ऑइल कंपनीत आहे नोकरीची संधीइंडियन ऑइल लिमिटेडमध्ये ४७ जागांसाठी भरती१५ जानेवारी आहे अर्जाचा शेवटचा दिवस

मुंबई
IOCL Recruitment 2020: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (Indian Oil Corporation Ltd, IOCL) नॉन-एग्जिक्युटिव्ह पदासाठी भरती निघाली आहे. यात एकूण ४७ जागांसाठीची ही भरती असणार आहे. 

इच्छुक आणि योग्य उमेदवारांना यासाठी IOCL.com या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज दाखल करता येणार आहे. अर्ज करण्यासाठीची १५ जानेवारी २०२१ ही शेवटची तारीख आहे. इंडियन ऑइल कंपनीतील या जागा पाइपलाइन डीव्हिजनमधील असून विविध ठिकाणांसाठी आहेत. 
उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी सर्व माहिती आणि नियमांचे वाचन करणे गरजेचे असून अतिशय अचूक अर्ज करणे आवश्यक आहे. नाहीतर तुमचा अर्ज रद्द ठरवला जाऊ शकतो. 

शैक्षणिक पात्रता काय असावी?
इंडियन ऑइलकडून निघालेल्या या नोकर भरतीसाठी कोणत्याही विषयातील इंजिनिअररिंगचे तीन वर्षांचे शिक्षण पूर्ण झालेलं असणं अनिवार्य आहे. याशिवाय उमेदवाराचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असू नये आणि २२ डिसेंबर २०२० पर्यंत उमेदवाराचे वय २६ वर्षांपेक्षा अधिक असता कामा नये. आरक्षित प्रवर्गासाठी या नियमामध्ये सवलत देण्यात आली आहे. 

अर्जाचे शुल्क किती?
नॉन एग्जिक्यूटिव्ह पदाच्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या आणि ओबीसी प्रवर्गासाठी अर्जासाठी प्रत्येकी १०० रु शुल्क भरावे लागणार आहे. तर एससी, एसटी आणि पीडब्ल्यूबीडी प्रवर्गासाठी यात सवलत देण्यात आली आहे. केवळ ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज दाखल करता येणार आहे. अधिक माहितीसाठी IOCL च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. 

अशी केली जाईल निवड
नॉन एग्जिक्यूटिव्ह पदाच्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, कौशल्य आणि आरोग्य चाचणीतून केली जाईल. लेखी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी तयार केली जाईल. त्यानंतर पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 
 

Web Title: job opportunities in Indian Oil How to apply Find out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.