MAHA METRO Recruitment 2021: अर्ज करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ
By जयदीप दाभोळकर | Published: January 26, 2021 03:18 PM2021-01-26T15:18:19+5:302021-01-26T15:20:07+5:30
महाराष्ट्रातील तरूणांना महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, मराठी भाषा येणं अनिवार्य
महाराष्ट्रमेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये टेक्निशिअन पदांसाठी भरती करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील तरूणांसाठी सुवर्णसंधी असून आता अर्ज करण्यासाठीही मुदतवाढ देण्यात आली आहे. आता इच्छुक उमेदवारांना ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करता येईल. ३१ जानेवारी रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. ही पदं नॉन सुपरवायझरी ऑपरेशन आणि मेंटेनन्स पुणेमेट्रो रेल प्रोजेक्टच्या अंतर्गत रेग्युलर बेसिसच्या आधारे भरती केली जाणार आहे. यामध्ये टेक्निशिअन (इलेक्ट्रिकल) साठी २३ पदं, टेक्निशिअन (फिटर), टेक्निशिअन (इलेक्ट्रॉनिक्स) आणि टेक्निशिअन (रेफ्रिजरेशन) या पदासांठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
या पदांसाठी कंम्प्युटर बेस्ड चाचणी घेतली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांची वैद्यकीय चाचणीही घेतली जाईल. या पदांसाठी दहावी उत्तीर्ण उमेदवाराकडे एमएससी उत्तीर्ण आणि आयटीआय एनसीव्हीटी आणि एससीव्हीच्या मान्यता प्राप्त संस्थांमधून इलेक्ट्रिकल, फिटर, मेसन सारखी सर्टिफिकेट्स असणं आवश्यक आहे, याव्यतिरिक्त संबंधित उमेदवाराकडे महाराष्ट्राचं डोमिसाईल आणि मराठी भाषा लिहिणं, वाचणं तसंच बोलणं अनिवार्य असेल.
या पदांसाठी १८ ते २५ ही वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अर्जासाठी खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ४०० रूपये आणि एससी, एसटी आणि महिला उमेदवारांना १५० रुपये नॉन रिफंडेबल शुल्क भरावं लागणार आहे. अधिक माहितीसाठी या ठिकाणी क्लिक करा.