-डॉ. यश वेलणकर
आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून मेंदूचे संशोधन होत आहे. त्यावरून मेंदूसंबंधी पूर्वी आपल्या अनेक जुन्या समजुती चुकीच्या होत्या असे लक्षात येते आहे। त्यातले काही गैरसमज समजून घेऊन स्वतःच्याच मेंदूकडे नव्यानं पाहिलं, तर आपलं आयुष्य अधिक सुकर होऊ शकेल.
पहिला गैरसमज
ठराविक वय झाले की मेंदूत बदल होणे थांबते।
सत्य
मेंदू आयुष्यभर सतत बदलत असतो।याला न्यूरॉप्लॅस्टिसटी म्हणतात. माणूस जे अनुभव घेत असतो त्यानुसार त्याच्या मेंदूत नवीन कनेक्शन तयार होत असतात. माणसाला एखादे काम सतत करावे लागले तर मेंदूतील त्या कृतीशी निगिडत भाग सक्रिय राहतो ।उदाहरणार्थ माणूस कॉम्प्युटर वर टाईप करीत असतो, त्यावेळी मेंदूतील ठराविक भाग सक्रिय असतो. हे काम सरावाचे होते त्यावेळी मेंदूच्या ते काम करणार्या भागात नवीन पेशी तयार होतात किंवा अशा पेशी तयार होतात त्याचवेळी ते काम सरावाचे झाले असे आपण म्हणतो।नियमित ड्रायव्हींग करणार्या आणि त्यासाठी दिशा लक्षात ठेवणार्या माणसांच्या मेंदूतील दिशांची जाणीव करून देणारा भाग विकिसत होतो असे संशोधनात दिसून आले आहे. एखादे कौशल्य वाढते त्याचे प्रत्यंतर प्रत्यक्ष मेंदूत दिसून येते. त्यामुळे जे कौशल्य आत्मसात करायचे आहे त्याचा नियमित सराव आवश्यक आहे।
दुसरा गैरसमज
स्वभावाला औषध नाही कारण तो मेंदुत जन्मजात असतो.
सत्य
वरील वाक्य अर्धसत्य आहे. दुसर्याच्या स्वभावाला औषध नाही, पण स्वतर् चा स्वभाव बदलता येतो।स्वभाव म्हणजे मेंदूतील ठराविक पाथवे, एक घटना घडली की मेंदूत ठराविक भाग ,एक ठरलेला मार्ग सक्रिय होतो, त्यानुसार आपली प्रतिक्रिया असते. या प्रतिक्रि या करण्याच्या पॅटर्न ला आपण स्वभाव म्हणतो. तो बदलता येतो. निसर्गतर् मेंदूत अमायगडाला नावाचा भाग सतत प्रतिक्रिया करत असतो. ही प्रतिक्रि या तीव्र असेल तर राग,चिंता,नैराश्य या भावना तीव्र असतात।माणसाचे अवधान असेल तर तो ही प्रतिक्रि या देण्याची सवय बदलवू शकतो. माईंडफूलनेस मेडिटेशनमध्ये ही सवय बदलायची असते। शरीरावरील संवेदना जाणल्या जात आहेत पण त्यांना प्रतिक्रि या दिली जात नाही. या स्थितीत मेंदूचे परीक्षण केले असता मेंदूतील भाविनक मेंदू म्हणजेच अमायगडाला शांत असतो आणि वैचारिक मेंदू म्हणजेच प्रीफ्रंटल कोरटेक्स मधील भावना नियंत्नण करणारा भाग अधिक सक्रिय असतो.अशी प्रतिक्रि या करण्याची सवय कमी केली की हळूहळू स्वभाव बदलतो. पण हे बदल दुसर्या माणसात करणे शक्य नसते कारण त्यासाठी मेंदूतील ही जडणघडण बदलणे गरजेचे असते,म्हणून दुसर्याच्या स्वभावाला औषध नाही।मेंदूतील ज्या पेशी एकाच वेळी सक्रिय असतात. त्या एकमेकांना जोडल्या जातात. त्यामुळे एखाद्या घटनेला ठराविक प्रतिक्रिया न करता माणूस वेगळा प्रतिसाद निवडतो त्यावेळी नवीन पाथवे तयार होतात, ते पाथवे दृढ झाले की स्वभाव बदलतो।मात्न केवळ बुद्धीच्या पातळीवर हे समजून उपयोग होत नाही. कारण मेंदूचे प्रोग्रामिंग बदलणे गरजेचे असते आणि ते सजगता ध्यानाच्या नियमति अभ्यासाने होते.माणूस जे काही शरीराने ,मनाने करीत असेल , मेंदूतील तो भाग त्यावेळी सक्रिय असतोच,पण ही सक्रियता तात्पुरती असते. मेंदूत रचनात्मक बदल दिसण्यासाठी ही सक्रियता अधिकाधिक वेळ राहावी लागते. याचे संशोधन झाले आहे, त्यानुसार रोज वीस मिनिटे असे दोन महिने सजगता ध्यान केले, म्हणजेच प्रतिक्रि या न करता संवेदना जाणण्याचा सराव केला की मेंदूतील भावना नियंत्नण करणारी केंद्रे विकिसत होतात हे दिसून आले आहे.