भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणात (NHAI) व्यवस्थापक पदासाठी नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत. इच्छुक उमेदवार NHAIच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. त्यासाठीची मुदत ९ मार्च २०२२ पर्यंत आहे.
अधिकृत नोटिफिकेशननुसार रिक्त पदांची संख्या एकूण ३४ इतकी आहे. यामध्ये मुख्य महाव्यवस्थापकाचं (फायनान्स) १ पद, उपव्यवस्थापकाचं (लीगल) १ पद, उपव्यवस्थापकाचं (मीडिया रिलेशन) १ पद आणि व्यवस्थापक (टेक) ३१ पदांचा समावेश आहे.
मुख्य महाव्यवस्थापक (फायनान्स) पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला ३७ हजार ४०० ते ६७ हजार रुपये इतका पगार मिळेल. उपव्यवस्थापक (लीगल) पदावर नियुक्ती होणाऱ्या उमेदवाराला १५ हजार ६०० ते ३९ हजार १०० रुपये इतकं वेतन दिलं जाईल. उपव्यवस्थापक (मीडिया रिलेशन), व्यवस्थापक (टेक) पदांसाठी निवड होणाऱ्या उमेदवारांना १५ हजार ६०० ते ३९ हजार १०० रुपये पगार देण्यात येईल.
या सर्व पदांसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. याबद्दलची संपूर्ण माहिती उमेदवारांना अधिकृत नोटिफिकेशनमध्ये मिळेल. उमेदवार ऑनलाईन अर्ज भरू शकतात आणि अर्ज अन्य संबंधित कागदपत्रांसोबत डीजीएम (एचआर अँड ऍडमिन), भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, प्लॉट नंबर- जी-५ आणि ६, सेक्टर १०, द्वारका, नवी दिल्ली- ११००७५ या पत्त्यावर पाठवू शकतात.