राजस्थान सरकारने 6000हून अधिक पदांसाठी सरकारी भरती काढली आहे. त्याअंतर्गत सामुदायिक आरोग्य अधिकारी(Community health officer)पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र व इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज करू शकतात. भरतीसंबंधित अधिकृत अधिसूचनेनुसार उमेदवार 16 सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. यासाठी कोणतीही लेखी किंवा संगणक आधारित परीक्षा घेतली जाणार नाही.एनएचएम राजस्थान सीएचओ भरती 2020अंतर्गत सामुदायिक आरोग्य अधिकारी (CHO)च्या एकूण 6310 पदं भरली जाणार आहेत. यामध्ये टीएसपी पदासाठी 1041 आणि टीएसपी नसलेल्या पदांसाठी 5269 भरती काढण्यात आल्या आहेत. एनएचएम राजस्थान भरती 2020 अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 25000 रुपये पगार देण्यात येईल.पात्रताया भरतीसाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील सामुदायिक आरोग्य किंवा नर्सिंगमध्ये बीएससी असणे आवश्यक आहे. त्याशिवाय जीएनएम किंवा बीएएमएस केलेले उमेदवारदेखील अर्ज करू शकतात.पदाचे वर्णनया भरतीसाठी 18 वर्षे ते 45 वर्षांपर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात. अर्जदारांचे वय 1 जानेवारी 2020 रोजी मोजले जाईल.अर्ज फीएनएचएम राजस्थान भरती 2020साठी सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांना अर्ज फी म्हणून 400 रुपये द्यावे लागतील. त्याचबरोबर ओबीसी / एमबीसी / एससी / एसटी प्रवर्गाच्या उमेदवारांना 300 रुपये रक्कम जमा करावी लागेल. ऑनलाइन पद्धतीने अर्ज फी भरली जाऊ शकते.
6310 पदांवर नोकरभरतीची सुवर्णसंधी, थेट मुलाखतीनं मिळणार नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 2:00 PM