Bank Jobs : पंजाब नॅशनल बँकेत 'या' पदांसाठी भरती, Interview च्या आधारे मिळेल नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 04:57 PM2022-02-07T16:57:43+5:302022-02-07T16:58:40+5:30
PNB Recruitment 2022 : अधिसूचनेनुसार, या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पदवी किंवा पदव्युत्तर किंवा व्यावसायिक पदवी (Degree) पूर्ण केलेली असावी.
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेने विशेष कार्यकारी (Specialized Executive) पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत मुख्य जोखीम अधिकारी, मुख्य अनुपालन अधिकारी (CCO), मुख्य वित्तीय अधिकारी (CFO), मुख्य तांत्रिक अधिकारी (CTO), मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (CISO) आणि मुख्य डिजिटल अधिकारी (CDO) या पदांवर भरतीसाठी एक भरती अधिसूचना (Notification) जारी केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी आहे.
अधिसूचनेनुसार, या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पदवी किंवा पदव्युत्तर किंवा व्यावसायिक पदवी (Degree) पूर्ण केलेली असावी. पंजाब नॅशनल बँकेमध्ये विशेष कार्यकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना किमान (Minimum) 20 वर्षांचा अनुभव असावा.
अधिसूचनेनुसार (According to Notification) दस्तऐवज पडताळणीच्या आधारावर प्राथमिक तपासणी आणि दस्तऐवज पडताळणीसाठी अर्ज शॉर्टलिस्ट केला जाईल. त्यानंतर वैयक्तिक मुलाखतीसाठी (Personal Interview) उमेदवारांची निवड केली जाईल. मुलाखतीतील कामगिरीच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना 3 वर्षांसाठी नियुक्त केले जाईल आणि 5 वर्षांपर्यंत वाढवता येईल. पात्रता आणि अनुभवाच्या आधारे वेतन दिले जाणार आहे.
अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट www.pnbindia.in वर जाऊन भरतीशी संबंधित अधिसूचना काळजीपूर्वक वाचा आणि त्यात दिलेल्या सूचनांनुसार आवश्यक कागदपत्रे जोडून महाव्यवस्थापक- एचआरएडी पंजाब नॅशनल बँक मानव संसाधन विभाग - पहिला मजला, वेस्ट विंग, कॉर्पोरेट ऑफिस सेक्टर 10, द्वारका, नवी दिल्ली-110075 या पत्त्यावर पाठण्यास सांगितले आहे.