JOB Alert : खूशखबर! नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी; रिझर्व्ह बँकेत 950 जागांसाठी लवकरच भरती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 03:23 PM2022-02-14T15:23:18+5:302022-02-14T15:34:51+5:30

RBI Assistant Recruitment 2022 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) मध्ये लवकरच काही पदांसाठी मोठी भरती होणार आहे.

RBI Assistant Recruitment 2022 reserve bank of india job notification to be released soon | JOB Alert : खूशखबर! नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी; रिझर्व्ह बँकेत 950 जागांसाठी लवकरच भरती

JOB Alert : खूशखबर! नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी; रिझर्व्ह बँकेत 950 जागांसाठी लवकरच भरती

Next

नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) मध्ये लवकरच काही पदांसाठी मोठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (RBI Assistant Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. साहाय्यक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी rbi.org.in या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2022 असणार आहे. तर अर्ज सुरू होण्याची तारीख 17 फेब्रुवारी 2022 असणार आहे. 

योग्यता 

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून आणि महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी भरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण करणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. 

अशी होणार उमेदवारांची निवड

सुरुवातीला पात्र असणाऱ्या उमेदवारांची पूर्व आणि मुख्य लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. 

उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांची Language Proficiency Test घेण्यात येणार आहे. 

डीव्ही आणि वैद्यकीय चाचणी घेण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या तारखा 

अर्ज भरण्याची तारीख - 17 फेब्रुवारी 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 08 मार्च 2022

एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: RBI Assistant Recruitment 2022 reserve bank of india job notification to be released soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.