JOB Alert : अरे व्वा! State Bank of India मध्ये ऑफिसर पदासाठी भरती, 24 लाखांपर्यंत पगार, आजच करा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 07:22 PM2022-04-17T19:22:13+5:302022-04-17T19:30:40+5:30

SBI SCO Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (Specialist Cadre Officer) पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. 

sbi recruitment 2022 for various specialist cadre officer posts salary up 25 lakhs rupees | JOB Alert : अरे व्वा! State Bank of India मध्ये ऑफिसर पदासाठी भरती, 24 लाखांपर्यंत पगार, आजच करा अर्ज

JOB Alert : अरे व्वा! State Bank of India मध्ये ऑफिसर पदासाठी भरती, 24 लाखांपर्यंत पगार, आजच करा अर्ज

googlenewsNext

नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank of India) नोकरीची सुवर्णसंधी असून ऑफिसर पदांसाठी भरती केली जाणार आहे. एसबीआयची अधिकृत वेबसाईट sbi.co.in वर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी  सविस्तर तपशील देण्यात आला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (Specialist Cadre Officer) पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. 

भरती (SBI Recruitment 2022) अंतर्गत, स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर्सची 8 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यामध्ये मॅनेजरची (Performance, Planning and Review) 2 पदे, सल्लागाराची (Fraud Risk) 4 पदे आणि सिनिअर एक्झिक्युटिव्हच्या (इकोनॉमिस्ट) 2 पदांचा समावेश आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी तपशील काळजीपूर्वक वाचावा. उमेदवारांना 28 एप्रिल 2022 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

अर्ज प्रक्रिया

सिनिअर एक्झिक्युटिव्ह (अर्थशास्त्रज्ञ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे सांख्यिकी, गणितीय सांख्यिकी, गणितीय अर्थशास्त्र, अर्थशास्त्र, अर्थमिती, सांख्यिकी आणि माहितीशास्त्र आणि माहितीशास्त्र या विषयातील पदव्युत्तर पदवीमध्ये 60% गुणांसह किंवा एमबीए/ पीजीडीएम या विषयात 60% गुणांसह फायनान्समध्ये मास्टर्स पदवी असणे गरजेचे आहे. याशिवाय उमेदवारांना संबंधित कामाचा 3 वर्षांचा अनुभव असावा.

सल्लागार (फ्रॉड अँड रिस्क) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार पदवीधर आणि सेवानिवृत्त आयपीएस किंवा राज्य पोलीस, सीबीआय, इंटेलिजन्स ब्युरो किंवा सीईआयबी अधिकारी असावा. त्याला संबंधित कामाचा किमान 5 वर्षांचा अनुभव असावा.

व्यवस्थापक या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार पदवीधर असावा. निवृत्त आयपीएस किंवा राज्य पोलीस, सीबीआय, इंटेलिजन्स ब्युरो किंवा सीईआयबी अधिकारी या पदासाठी अर्ज करू शकतात. अर्जदाराला संबंधित कामाचा किमान 5 वर्षांचा अनुभवही असावा.

अर्ज शुल्क

सामान्य, ओबीसी, ईडब्ल्यूएस उमेदवारांना 750 रुपये अर्ज शुल्क आणि सूचना शुल्क भरावे लागेल, एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांना अर्ज शुल्कातून सवलत देण्यात आली आहे.

वयोमर्यादा

सल्लागार (फ्रॉड अँड रिस्क) – 63 वर्षांपेक्षा कमी असावे.
वरिष्ठ कार्यकारी (अर्थशास्त्र) - 32 वर्षांपर्यंत असावे.
व्यवस्थापक- किमान वयोमर्यादा 25 वर्षे आणि कमाल 35 वर्षे

निवड प्रक्रिया

सिनिअर एक्झिक्युटिव्ह (अर्थशास्त्रज्ञ) या पदाव्यतिरिक्त इतर पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे.

वरिष्ठ कार्यकारी (अर्थशास्त्रज्ञ) पदासाठी निवड शॉर्टलिस्टिंग आणि चर्चेवर आधारित असेल.

पगार

सल्लागार (फ्रॉड अँड रिस्क) पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 1 लाख 25 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाईल. 

वरिष्ठ कार्यकारी (अर्थशास्त्रज्ञ) या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 18 लाख ते 24 लाख रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: sbi recruitment 2022 for various specialist cadre officer posts salary up 25 lakhs rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.