IRCTC सोबत करा बिझनेस, महिन्याला ८०,००० पर्यंत कमावण्याची संधी; जाणून घ्या प्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 08:24 PM2022-01-30T20:24:33+5:302022-01-30T20:25:57+5:30
ज्या प्रकारे रेल्वे काऊंटरवर क्लार्क तिकीट देतो तसेच तुम्हाला रेल्वे प्रवाशांना तिकीट द्यावं लागेल.
नवी दिल्ली – जर तुम्ही एखादा बिझनेस सुरु करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी कामाची बातमी आहे. आज आम्ही तुम्हाला अशा बिझनेसबद्दल सांगणार आहोत ज्यातून तुम्हाला जबरदस्त फायदा होईल. या बिझनेसच्या माध्यमातून तुम्ही चांगली कमाई करु शकता. सर्वात खास बाब म्हणजे हा बिझनेस तुम्हाला भारतीय रेल्वेसोबत करायचा आहे. काय आहे नेमका हा बिझनेस जाणून घेऊया.
८० हजार कमावण्याची संधी
इंडियन रेल्वे कॅटरिंग अँन्ड टूरिझम कॉर्पोरेशन म्हणजे IRCTC रेल्वेची एक सर्व्हिस आहे. या माध्यमातून तिकीट बुकींगपासून अन्य सुविधा मिळतात. आता तुम्ही IRCTC च्या मदतीनं दर महिन्याला पैसे कमवू शकता. त्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरबसल्या यातून रक्कम मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला केवळ तिकीट एजेंट बनावं लागेल. त्या बदल्यात महिन्याला ८० हजार रुपयांपर्यंत कमाई करु शकता.
ज्या प्रकारे रेल्वे काऊंटरवर क्लार्क तिकीट देतो तसेच तुम्हाला रेल्वे प्रवाशांना तिकीट द्यावं लागेल. ऑनलाईन तिकीट विक्री करण्यासाठी तुम्हाला IRCTC च्या वेबसाईटवर जात एजेंटसाठी एप्लाय करावं लागेल. त्यानंतर तुम्ही अधिकृत तिकीट एजेंट बनू शकता आणि घरात मोठी कमाई करु शकता. जर तुम्ही IRCTC ची ऑथराइज्ड तिकीट बुकिंग एजेंट बनला तर प्रत्येक ट्रेनचं तिकीट बुक करु शकता. ज्यात तात्काळ, आरएसी यांचाही समावेश असतो. तिकीट बुक केल्यानंतर तुम्हाला IRCTC नंतर एजेंट्स चांगले कमीशन मिळू शकते.
कशी होईल कमाई?
जर तुम्ही एजेंट असाल आणि कुठल्याही प्रवाशाचे नॉन एसी कोचचं तिकीट बुक केले तर तुम्हाला प्रति तिकीट २० रुपये आणि एसी क्लासचं तिकीट बुक केल्यावर प्रति तिकीट ४० रुपये कमीशन मिळेल. त्याशिवाय तिकीटाच्या किंमतीत १ टक्केही एजेंटला दिले जाणार आहेत.
किती आहेत शुल्क?
IRCTC एजेंट बनण्यासाठी काही शुल्क आकारलं जातं. १ वर्षासाठी एजेंट बनायचं असेल तर IRCTC ला ३ हजार ९९९ रुपये द्यावे लागतात. जर तुम्ही २ वर्षासाठी एजेंट बनत असाल तर त्यासाठी ६ हजार ९९९ रुपये चार्ज आहे. त्याशिवाय एजेंटनं एक महिन्यात १०० तिकीट बुक केल्यावर प्रति तिकीट १० रुपये फी द्यावी लागेल. तसेच १०१ ते ३०० तिकीट बुक केल्यानंतर प्रति तिकीट ८ रुपये आणि एक महिन्याहून ३०० हून अधिक तिकीट बुक केल्यावर प्रति तिकीट ५ रुपये फी द्यावी लागेल.
काय आहे फायदा?
IRCTC एजेंट बनल्यानंतर आणखी एक फायदा म्हणजे यात तिकीट बुक करण्याची कुठलीही मर्यादा नाही. महिन्याला तुम्हाला हवं तेवढी तिकीट बुक करु शकता. त्याशिवाय १५ मिनिटांत तात्काळ तिकीट बुक करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. इतकचं नाही तर एजेंट बनल्यानंतर तुम्ही ट्रेनशिवाय प्लेनचंही तिकीट बुक करु शकता.