एक मोठा वर्ग वेळोवेळी तज्ज्ञ मार्गदर्शन अपेक्षित करत असतो. अनेक माणसे काही विशेष विषयात खासे जाणकार असतात. पण तो विषय त्यांना दुसऱ्यांना उत्तम प्रकारे समजावून देता येत नाही. काही लोकांना कमीत कमी वेळात त्यांच्या गरजेच्या विषयाची तज्ज्ञ माहिती व मार्गदर्शन हवे असते. अशा लोकांना मार्गदर्शन करणारा ‘ट्रेनर’ ही एक उत्तम करिअर संधी ठरू शकेल. कारण ती एक प्रकारची व्यावसायिकता व उद्योजकीय विकासाची कर्तबगारीच म्हणता येईल.आपल्या मनासारखी नोकरी आजच्या युगात सहज सुंदरतेने मिळवता येणे ही एक कर्तबगारीच म्हणता येईल. प्रशिक्षक अथवा ट्रेनर बनणे हे स्वत:च्या पायावर उभे राहून एक सन्माननीय भूमिका करण्यासारखेच आहे. विशेष म्हणजे आपल्या विशेषतेप्रमाणे व मार्केटिंग कौशल्याच्या आधारे हवे तसे उत्पन्न मिळणाºया संस्थांना उत्तम प्रशिक्षकाची गरजच असते. (इन हाऊस ट्रेनर) आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे प्रशिक्षकहा आपल्या बाजूने देणारा असतो. त्यामुळे जनसमुदायापुढे त्याचा आत्मविश्वास नेहमी वरतीच असतो.उत्तम ट्रेनरला चांगले सादरीकरण करता येत असते. तो एक चांगला वक्तादेखील असतो. त्याला प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात चांगले बोलता येते. तो एक चांगला निवेदकही ठरू शकतो व वेळप्रसंगी त्याला एक मोठ्या कार्यक्रमात प्रस्तावना अथवा विशेष सांगता करता येऊ शकते. उत्तम प्रशिक्षक होण्यातून समाजात, चारचौघात एक विशेष लकबीत वावरता येते व समोरचा माणूस त्याला विशेष अदबीने पाहत असतो.आज अनेक क्षेत्रांत तुम्हाला प्रशिक्षक म्हणून वावरता येऊ शकते व त्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शन घेता येते. आज विशेष मार्गदर्शकांचे ट्रेनर्स ट्रेनिंग कोर्सेस व प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध असतात. सॉफ्ट स्किल्स, व्यक्तिमत्त्व विकास, सभाधीटपणा, फॉरेन लँग्वेज, नेतृत्व विकास, माइंड प्रोग्रामिंग, स्ट्रेस मॅनेजमेंट, सेल्समनशिप, व्यवसाय विकास, धन व्यवस्थापन अथवा कोणत्याही आपल्या आवडीच्या विषयाचा प्रशिक्षक होता येते. मार्गदर्शक मात्र उत्तम निवडणे विशेष गरजेचे असते.मला हे जमूच शकणार नाही हा विचार मनात येऊ देता कामा नये. आपली देहबोली, आवाज, सांगण्याची पद्धत, विषयात गोडी निर्माण करण्याची खुबी, माइकचा व उपकरणांचा व्यवस्थित वापर करता येणे या साºया खुबी शिकाव्या लागतात.बºयाच वेळेस आपणास असे वाटते की ते काय आपल्याला सहज जमू शकेल. पण प्रत्यक्षात आपण लोकांसमोर उभे राहतो तेव्हा नाकीनऊ येतात. काही लोकांना रटाळ पद्धतीने बोलत राहण्याची सवय असते. ते त्या भाषेत तज्ज्ञ असतात, पण मांडणी करण्याचे कौशल्य त्यांना जमतच नाही. अशा लोकांचे व प्रशिक्षकांचे कार्यक्रम कंटाळवाणे होतात. म्हणूनच आपल्यातला एक उत्तम वक्ता व प्रशिक्षक साकारण्यासाठी काही काळ देणे अत्यावश्यक बनते. उत्तम व प्रभावी बोलणाºयांची मागणी वाढत जाते व अशा माणसाचे लोक चाहते बनतात.लोकांना आपल्या क्षेत्रात खूप यशस्वी व्हायचे असते म्हणून वेळ वाचवत ते तज्ज्ञ ट्रेनरच्या शोधात असतात. तुमच्या आवडत्या विषयाचे तुम्ही प्रशिक्षक बनू शकता. उत्तम भविष्य असलेले ते सुंदर करिअर आहे. पार्टटाइमकरितादेखील ते उत्तम माध्यम ठरू शकते.
‘ट्रेनर’ : करिअरची एक उत्तम संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 1:27 AM