१९ काेरोना पॉझिटिव्ह आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:28 AM2021-01-20T04:28:42+5:302021-01-20T04:28:42+5:30
उपचारादरम्यान ६९ वर्षीय एका बाधिताचा आज मृत्यू झाला आहे. २४७ ॲक्टिव्ह रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची ...
उपचारादरम्यान ६९ वर्षीय एका बाधिताचा आज मृत्यू झाला आहे. २४७ ॲक्टिव्ह रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या २२ हजार ८७१ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार २४१ झाली आहे. सध्या २४७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एक लाख ९० हजार ९२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक लाख ६५ हजार ५१७ नमुने निगेटिव्ह आले आहेत. आज मृत झालेल्यामध्ये वणी येथील ६९ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३८३ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी जिल्ह्यातील ३४७, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १९, यवतमाळ १३, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. आज बाधित आलेल्या १९ रुग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रातील सहा, चंद्रपूर तालूका एक, बल्लारपूर दोन, ब्रह्मपुरी तीन, चिमूर चार, वरोरा एक, कोरपना एक व इतर ठिकाणच्या एका रुग्णाचा समावेश आहे. कोरोना आजार गेला नाही, कोरोनाचे रुग्ण बहुतांश तालुक्यात आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.