लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खरीप हंगामात जिल्ह्यातील ९७ हजार २१ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेतंर्गत विमा काढला. विमा हप्त्याची रक्कम २९४ कोटी एवढी आहे. हंगातील प्रतिकूल स्थितीमुळे विमाधारक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ३७० शेतकऱ्यांनी ७२ तासात विमा कपंनीकडे ऑनलाईन तक्रारी केल्या. प्रशासनाकडून जलदगतीने पाठपुरावा झाला. मात्र, भरपाई अद्याप मिळाली नाही. जिल्ह्यात ७६, २९८ कर्जदार व बिगर कर्जदार २० हजार ७२३ शेतक-यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे. यासाठी शेतक-यांनी ७ कोटी २९ लाख, केंद्र सरकार व राज्य सरकारकडून प्रत्येकी १३ कोटी, ९७ लाखांचे अनुदान असे एकूण ३५ कोटी २३ लाखांचा विमा हप्ता मंजूर झाला. पीक विम्यामुळे ६९ हजार २३३. ९८ हेक्टर शेती विमा संरक्षित झाली. स्थानिक नैसगीर्क आपत्ती व काढणी पश्चात पिकांचे नुकसान झाले. ३७० शेतक-यांनी ७२ तासात ऑनलाईन तयारी केल्या. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने लगेच पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे सवेक्षणाचे काम पूर्ण झाले. परंतु विमा कंपन्यांकडून मदत मिळाली नाही.
तक्रारदार सर्वच शेतकऱ्यांचे पंचनामेप्रधानमंत्री पीक विमा काढणा-या शेतक-यांनी ऑनलाईन तक्रारी केल्यानंतर कृषी व महसूल विभागाने तातडीने दखल घेतली. पंचनामे करून अहवाल सादर करण्यात आला. नैसगीर्क आपत्ती २६४, प्रतिकूल हंगाम ९ हजार ५८५ व पीक काढणी पश्चात नुकसान झालेल्या शेतक-यांना भरपाई मिळाल्याने खरीप हंगामात दिलासा मिळाला आहे.
९,५८५ शेतकऱ्यांना भरपाईयंदाच्या खरीप हंगामात स्थानिक नैसगीर्क आपत्तीमुळे ब्रह्मपुरी तालुक्यात मोठे नुकसान झाले. वैनगंगा नदीला पूर आल्याने शेती उद्धवस्त झाली. प्रशासनाकडे लगेच कार्यवाही केली. त्यामुळे ९ हजार ५८५ शेतक-यांना भरपाई मिळाली. हंगामातील प्रतिकूलता व काढणी पश्चात नुकसानीचीही भरपाई लवकरच मिळणार आहे.
प्रधानमंत्री पीक विमा काढणाºया सर्व शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळाली. संपर्क साधणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य माहिती दिली जात आहे. सर्वेक्षणाचे कामही पूर्ण झाले. शेतकऱ्यांना लवकरच भरपाई मिळणार आहे.- डॉ. उदय पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी