लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात १८ लाख ४० हजार ५७ मतदारांची नोंदणी झाली. यामध्ये ५३ हजार ८०३ नवीन मतदारांची वाढ झाली असून यंदा पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम सुरू असल्याने ही संख्या ७० हजारांहून अधिक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रह्मपुरी, चिमूर व वरोरा विधानसभानिहाय मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार मतदान केंद्र तसेच मतदान नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी, जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन नोटीस बोर्डावर ही मतदार यादी लावण्यात आली आहे. १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर मतदान नोंदणी कार्यक्रम जिल्हाभरात राबविण्यात आला. यानुसार जिल्ह्यात १८ लाख ४० हजार ५७ मतदारांची पहिली यादी प्रसिद्ध झाली. मतदार नोंदणीसोबत मतदान ओळखपत्र, ओळखपत्रातील दुरूस्ती कार्यक्रमासाठी विधानसभानिहाय यंत्रणा तयार करण्यात आली. काही मतदारांची नावे, गाव व अन्य माहितीत चुका आढळल्याने मोहिमेदरम्यान दुरूस्ती केल्या जाणार आहे. कृष्णधवल छायाचित्र असणाºया मतदारांनी या मोहिमेदरम्यान रंगीत छायाचित्र आणून देण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.८ लाख ९४ हजार महिला मतदारजिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघातील ८ लाख ९४ हजार २६४ महिला मतदारांची यादी जाहीर झाली. यामध्ये सर्वाधिक चंद्रपूर १ लाख ९२ हजार ९१ आणि राजुरा मतदार संघात १ लाख ४८ हजार ९६७ महिला मतदारांचा समावेश आहे. बल्लारपूर क्षेत्रात आतापर्यंत १ लाख ५३ हजार २८३ महिला मतदारांची नोंदणी झाली आहे.शेकडो नावे वगळलीमयत, दुबार व स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. मतदारांची गैरसोय दूर करण्यासाठी आॅनलाईन मतदार नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. १ जानेवारी २०१८ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाºया व्यक्तींना मोहिमेदरम्यान मतदार म्हणून नाव नोंदणी करता येणार आहे.
जिल्ह्यात ५३ हजार ८९३ नवमतदारांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 12:19 AM
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात १८ लाख ४० हजार ५७ मतदारांची नोंदणी झाली. यामध्ये ५३ हजार ८०३ नवीन मतदारांची वाढ झाली असून यंदा पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम सुरू असल्याने ही संख्या ७० हजारांहून अधिक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ठळक मुद्देनोंदणी मोहीम सुरूच : आतापर्यंत १८ लाख ४० हजार मतदारांची यादी जाहीर