८,४४० वाहनधारकांना विनाकारण फिरणे भोवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2020 05:00 AM2020-05-01T05:00:00+5:302020-05-01T05:01:05+5:30
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून अन्य वाहनांना रस्त्यावर येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र कोरोनाचे गांभीर्य नसलेले अनेकजण वाहनाद्वारे मुक्त संचार करीत आहेत. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करून शिस्त लावण्याचे काम वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांच्या नेतृत्वात ८० कर्मचारी करीत आहेत.
परिमल डोहणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन असताना घराबाहेर पळू नये, अशा प्रशासनाच्या सूचना आहे. तरीही नियमांची पायमल्ली सुरू असल्याची बाब पोलिसांनी केलेल्या वाहनधारकांवरील कारवाईतून दिसून येते. वाहतुक नियंत्रण शाखेने २४ मार्च ते २९ एप्रिल या कालावधीत विशेष मोहीम राबविली. यामध्ये तब्बल ८ हजार ४४० वाहनांवर कारवाई केली असून दहा लाख ४३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आली आहे. यामध्ये ६६७ वाहने जप्त करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून अन्य वाहनांना रस्त्यावर येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र कोरोनाचे गांभीर्य नसलेले अनेकजण वाहनाद्वारे मुक्त संचार करीत आहेत. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करून शिस्त लावण्याचे काम वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांच्या नेतृत्वात ८० कर्मचारी करीत आहेत.
लॉसकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी घराबाहेर पडण्यावर बंदी घातली आहे. तरीही काही वाहनधारक विनाकारण घराबाहे पडत आहे. अशांवर वाहतुक नियंत्रण शाखेचे पोलीस नाकाबंदीदरम्यान कसून तपास करीत आहे. यामध्ये आतापर्यंत ८ हजार ४४० वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर ६६७ वाहने जप्त करण्यात आली आहे.
4034 अनपेड कारवाई
वाहतूक पोलिसांनी महिनाभरात आठ हजार ४४० कारवाई केल्या. यामध्ये चार हजार ४०६ पेड कारवाईमध्ये दहा लाख ४३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला. तर चार हजार ३४ अनपेड कारवाया करण्यात आल्या. या कारवाईतील दंड १५ दिवसांच्या आत भरण्याच्या सूचना वाहनचालकांना दिल्या आहेत. तर ६६७ वाहने जप्त केली आहेत.
वाहनचालकांचे समुपदेशन
कोरोना हा संसर्गजन्य विषाणू असल्याने लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे वाहनचालकांनी विनाकारण फिरू नये, घरीच राहावे, आरोग्याची काळजी घ्यावी, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, अशा शब्दात वाहनचालकांना समुपदेशन करण्याचे काम वाहतूक पोलीस करीत आहेत.
292 जमावबंदीच्या कारवाया
कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १४४ (१) (३) अन्वये जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेश लागू केलेले आहेत. त्यानुसार कलम १८८ अन्वये आतापर्यंत २९२ कारवाया करण्यात आल्या असून त्यांच्याकडूनही दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोनाचा धोका असल्याने कुणीही विनाकारण बाहेर निघू नये, असे प्रशासनाचे निर्देश आहे. मात्र अनेकजण उल्लंघन करीत असल्याचे दिसून येत आहे. अशा वाहन चालकिांविरोधात विशेष मोहिम सुरु केली आहे. त्यानुसार दंड आकारण्यात आला.
- हृदयनारायण यादव, पोलीस निरीक्षक, वाहतुक नियंत्रण शाखा, चंद्रपूर