चंद्रपूर : ब्रम्हपुरी तालुक्यातील बेलगाव येथे नळ पाणीपुरवठा योजनेचा पाईप लाईनचे काम करणाऱ्या गरीब मजुराला ट्रॅक्टरला बांधून अमानुष मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून सोशल मीडियावर चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे.
सोमवारी सोशल मीडियावर एका मजुराला ट्रॅक्टरला बांधून बेदम मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला. माझ्या बाईकडे का बघीतले? म्हणत ही मारहाण करण्यात आली व त्यानंतर ट्रॅक्टरला बांधून अश्लील शिवीगाळ करत व्हिडिओ चित्रित करून समजमध्यामांवर व्हायरल केला. या घटनेने एकच खळबळ उडाली.
दरम्यान, घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. यावेळी आरोपीच्या हातात कोयता देखील होता. दोन्हीकडून तक्रार दाखल करण्यात आली नाही. त्यामुळे पोलिसात अद्याप गुन्हा नोंद करण्यात आला नसल्याचे समजते.