४८ तासांत सापडले आरोपी

By admin | Published: April 13, 2015 01:57 AM2015-04-13T01:57:34+5:302015-04-13T01:57:34+5:30

खिडकीतील चावी घेऊन कुलूप उघडत घरात प्रवेश केला. कपाटातील सोने व रोख असा ५ लाख ४८ हजार रुपयांचा ऐवज

The accused found in 48 hours | ४८ तासांत सापडले आरोपी

४८ तासांत सापडले आरोपी

Next

वरोरा पोलिसांचे यश : सहा लाखांचे दागिने चोरी प्रकरण
वरोरा :
खिडकीतील चावी घेऊन कुलूप उघडत घरात प्रवेश केला. कपाटातील सोने व रोख असा ५ लाख ४८ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला होता. घराचे आणि कपाटाचे कुलूप शाबुत असल्यामुळे व श्वान पथक घरातच फिरल्याने पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले होते. मात्र वरोरा पोलिसांनी अवघ्या ४८ तासात दोन युवकांना ताब्यात घेऊन दोघांकडून ५ लाख ४८ हजाराचे सोने व रोख जप्त केले.
आकाश वामन कुरेकार (२५) रा. शिवाजी वार्ड वरोरा व संदिप दादाजी मत्ते (२२) रा. आंबेडकर लेआऊट अशी आरोपींची नावे आहे. वरोरा शहरातील शिवाजी वॉर्डातील गजानन कुरेकार हे ९ एप्रिल रोजी आपल्या कुटुंबियासह वरोरा तालुक्यातील शेंबळ येथे नामकरण सोहळ्यासाठी गेले होते. ९ एप्रिलला रात्री घरी परत आले. १० एप्रिल रोजी सकाळी अंगावरील दागिने कपाटात ठेवण्यास गेले असता कपाटातील २५ तोळे सोने व १९ हजार रुपये आढळून आले नाही. १० एप्रिल रोजी वरोरा पोलिसात तक्रार दिली. वरोरा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल करीत श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते.
परंतु घरच्यांनी वस्तु हाताळल्याने ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाकडूनही ठोस काही हाती लागले नाही. चोरी करताना दाराचे कुलूप चावीने उघडल्याने चावी खिडकीत ठेवत असल्याची माहिती असणाऱ्यावर वरोरा पोलिसांनी लक्ष केंद्रित केले. चोरी झाल्यानंतर पोलिसांनी आकाश वामन कुरेकार (२५) रा. शिवाजी वार्ड वरोरा व संदीप दादाजी मत्ते (२२) रा. आंबेडकर लेआऊट यांना संशयावरून ताब्यात घेऊन विचारपूस केली. परंतु प्रारंभी त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यानंतर कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कुबली दिली.
सोने व रोख आकाशने आपल्या घरातील बॅगमध्ये ठेवले व काहीही झाले नाही, असा बनाव करीत वावरत होते.
आकाश व संदीपने चोरी केल्याची कबुली देते. संपूर्ण सोने व रोख असा पाच लाख ४८ हजारांचा ऐवज पोलिसांच्या स्वाधीन केला. प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन इंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अमोल सांगणे, सहायक फौजदार नितीन जाधव, पोलीस हवालदार उमाकांत गौरकार, दामोधर करंबे, राकेश तुराणकर, निकेश ठेंगे, निलेश मुंडे, अनिल बैठा यांनी केला. (तालुका प्रतिनिधी)

अशी केली चोरी
९ एप्रिल रोजी दुपारी दोन ते पाच वाजताच्या सुमारास आकाश कुरेकार खिडकीतील चावी घेऊन घरात गेला व संदीप मत्ते याने बाहेरून दार लावून देत तो रस्त्यावर उभा राहिला. आकाशने कपाटातील चावी घेऊन कपाट उघडले व त्यातील २५ तोळे सोने व १९ हजार रुपये रोख एका प्लॅस्टीकमध्ये टाकले. कपाट पूर्वी प्रमाणेच लावले. काम पूर्ण झाले म्हणून संदीपच्या मोबाईलवर कॉल केला. त्यानंतर संदीपने खिडकीतील चावी घेऊन दार उघडले. आकाश व संदीपने दाराला परत कुलूप लावून चावी खिडकीत ठेवली.
नातेवाईकच निघाले चोर
यामधील आरोपी आकाश वामन कुरेकार हा २००५ मध्ये मिल्ट्रीमध्ये नोकरीस लागला होता. जानेवारी २०१५ मध्ये मिल्ट्रीमध्ये कर्तव्यावर असताना तो चक्कर येऊन पडल्याने दोन महिने दिल्ली येथे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याला पॅरलेसीसचा झटका आल्याने तो मागील महिन्यात वरोरा येथे आराम करण्यासाठी आला होता. आकाशने त्याचा नातेवाईक असलेल्या संदीप मत्तेला सोबत घेऊन चोरीची योजना आखली. चोरट्यांनी ज्यांच्या घरी चोरी केली, ते त्यांचे नातेवाईकच निघाले. चोरीचा ऐवज आकाशने आपल्या मिल्ट्रीमधून मिळालेल्या पेटीत ठेवला होता, हे विशेष.

Web Title: The accused found in 48 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.