डेंग्यू आजारावर प्रशासनाची धावपळ
By Admin | Published: August 28, 2014 11:42 PM2014-08-28T23:42:05+5:302014-08-28T23:42:05+5:30
तालुक्यातील बेलगाव (कोलारी) येथे अनेकांना डेंग्यु आजाराची लागण झाली. आजार नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरु केल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.
ब्रह्मपुरी : तालुक्यातील बेलगाव (कोलारी) येथे अनेकांना डेंग्यु आजाराची लागण झाली. आजार नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरु केल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.
लोकमतने ‘बेलगावात डेंग्युची लागण’ या आशयाची बातमी प्रकाशित झाली. हे वृत्त छापून येताच जिल्हा वैद्यकीय प्रशासन व स्थानिक पोलीस प्रशासन यांनी आज गावात दिवसभर आजार आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. वैद्यकीय प्रशासनाची चमू दिवसभर गावात सर्तक होती व परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होते. गावात शेणाचे व तनसाचे ढग घराशेजारी असल्याने डासांचे प्रमाण वाढले होते.
त्यामुळे डेंग्युचा आजार वाढला. शेणाचे ढिग हटविण्यात यावे या बाजूने गावकरी होते. तर काही नागरिक विरोधात होते. शेवटी पोलीस जमादार सुरेश पानसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गावकऱ्यांना समजवून मध्यस्थती करण्याचा प्रयत्न केला. सर्वसमावेशक घडामोडीतून जेसीबी लावून खड्डे बुजविण्याचा निर्णय घेण्यात आला.
डेंग्युच्या आजारासाठी गावकरीच कारणीभूत असल्याचे निर्दशनास आले. गावात फेरफटका मारला असता घरी शौचालय असून त्याचा वापर होत नसल्याचे दिसून आले आहे. प्रशासनाने ठराव घेऊन शौचालय वापर बंधनकारक करण्याविषयी ठराव घेतला. दरम्यान जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेता सतिश वारजुकर यांनी घटनास्थळी भेट देऊन जी युवती आजाराने दगावली, तिला आर्थिक मदत दिली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला तत्काळ उपाय योजना करण्याविषयी सूचना दिल्या. आजाराची परिस्थिती प्रशासनाच्या धापवळीने नियंत्रणात आहे. (तालुका प्रतिनिधी)