शासकीय वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरू करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:50 AM2021-02-18T04:50:56+5:302021-02-18T04:50:56+5:30
कोरोनामुळे लॉकडाऊन लावण्यात आले होते. यात शाळा, महाविद्यालयेही बंद होती. बाहेर गावातून शहरात शिक्षण घेण्यासाठी आलेले विद्यार्थी स्वगावी परतले ...
कोरोनामुळे लॉकडाऊन लावण्यात आले होते. यात शाळा, महाविद्यालयेही बंद होती. बाहेर गावातून शहरात शिक्षण घेण्यासाठी आलेले विद्यार्थी स्वगावी परतले होते. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत असल्याने शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहे. विद्यार्थी पुन्हा शहरात येत आहेत. यात आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांचीही संख्या मोठी आहे. मात्र आदिवासी विकास विभागांतर्गत असलेले शासकीय महाविद्यालयीन वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया बंद असल्याने राहायचे कुठे, असा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडने केली. यावेळी आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, नितेश बोरकुटे, लता पोरेते, शुभांगी जीवतोडे, अश्विना नन्नावरे, वैशाली जीवतोडे, सपना दडमल आदी उपस्थित होते.