जमिनीचा मोबदला व नोकरी देण्याच्या लिखीत आश्वासनानंतर नमले प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:29 AM2021-03-27T04:29:47+5:302021-03-27T04:29:47+5:30
सास्ती : वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रातील सास्ती - धोपटाला यु.जी. -२ कोळसा खाणीकरिता शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहण करून ...
सास्ती : वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रातील सास्ती - धोपटाला यु.जी. -२ कोळसा खाणीकरिता शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहण करून तब्बल नऊ वर्षाचा कालावधी लोटला. जमिनीचा मोबदला व नोकरी न मिळाल्याने प्रकल्पग्रस्तांनी वेकोलि प्रशासनाला सात दिवसाचा अल्टिमेट देत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
परंतु वेकोलिने मागण्या पूर्ण न केल्यामुळे अखेर प्रकल्पग्रस्तांनी शुक्रवारी आंदोलन पुकारून सास्ती चेकपोस्ट वर सहा तास कोळसा वाहतूक रोखून धरली. वेकोलि व्यवस्थापनाने ३० एप्रिलपर्यंत जमिनीचा मोबदला व नोकरी देण्याच्या लिखित आश्वासनानंतर प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन मागे घेतले.
राजुराचे माजी आमदार ॲड. वामनराव चटप, माजी आमदार ॲड. संजय धोटे, जिल्हा परिषद सभापती सुनिल ऊरकुडे यांनी आंदोलन स्थळाला भेट देऊन आंदोलनास समर्थन केले. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी वेकोलि प्रशासनाची चर्चा केली. वेकोलि प्रशासनाने ३० एप्रिलपर्यंत प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा मोबदला व नोकरी देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या कोळसा खाणी करिता सास्ती,धोपटला, कोलगांव, मानोली, भडांगपूर या गावातील ८१४ शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. बऱ्याच वर्षापासून जमिनीचा मोबदला व नोकरी न मिळाल्यामुळे प्रकल्पग्रस्त आर्थिक संकटात सापडले. आंदोलनाप्रसंगी सास्तीचे सरपंच रमेश पेटकर, उपसरपंच कुणाल कुंडे, कोलगाववचे सरपंच अनिता सुधाकर पिपळकर, उपसरपंच पुरुषोत्तम लांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सरीता कुडे, नरसिंग मादर, गणेश चन्ने, मधुकर नरड, संतोष चन्ने, वासुदेव बुटले, संतोष शेंडे, अक्षय निब्रड,, राजु पिंपळकर, बालाजी पिंपळकर, राजु दिवशे, राजु निषाद, दिनेश वैरागडे, दिलीप बुटले, प्रभाकर सोनटक्के, तपासे, अनिल बोनगीरवार, गणपत काळे, सचीन शेंडे, महेश लांडे, राजु भटारकर, दिलीप नरड, विलास घटे, किशोर लोहबडे, आकाश चन्ने,किशोर कुडे, राकेश चन्ने, विलास भटारकर, नितीन भटारकर, सचीन चन्ने, मारोती लांडे, दत्ता कुडे, प्रमोद पेटकर सह शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.