जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत म्हणाले, रोखपाल निखिल घाटे यांनी रोख रकमेत ६९ लाख ६७ हजार ८०५ रुपयांची अफरातफर केल्याचे प्रथमदर्शी आढळले. त्यामुळे त्यांच्या नावाने खात्याला अग्रीम रक्कम दर्शवून त्या दिवसाचा संपूर्ण व्यवहार बंद करण्यात आला. त्यानंतर १३ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी व चंद्रपूर शाखा व्यवस्थापकाने रामनगर ठाण्यात तक्रार केली. दुपारी २ वाजता पोलिसांनी रोखपाल घाटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर १४ फेब्रुवारी रोजी बँकेच्या प्रमुख कार्यालयातून चंद्रपूर शाखेच्या सर्व १७१ ग्राहकांना त्यांच्या खात्यातील शिल्लक रकमेबाबत मोबाइलवर एसएमएसद्वारे संदेश पाठविण्यात आला. घाटे यांचे सर्व खाते लॉक करून सोमवारी निलंबनाची कारवाई केली. मंगळवारपर्यंत २९ ग्राहकांनी तक्रारी केल्या. या तक्रारींच्या अनुषंगाने शहानिशा करून रामनगर पोलीस ठाण्याला माहिती देणे सुरू आहे. जिल्हा बँकेतील सर्व ठेवी सुरक्षित आहेत. ग्राहकांनी अफवांना बळी पडू नये. दोषींवर कारवाई होणारच आहे, अशी माहिती अध्यक्ष संतोष रावत यांनी दिली. यावेळी संचालक संदीप गड्डमवार, शेखर धोटे, डॉ. विजय देवतळे, रवींद्र शिंदे व अन्य संचालक उपस्थित होते.
जिल्हा बँकेतील सर्व ठेवी सुरक्षित, दोषींवर कारवाई होणारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 4:34 AM