रेती घाट परिसरातील सर्व रस्ते बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:25 AM2021-04-03T04:25:11+5:302021-04-03T04:25:11+5:30
रेती तस्करांमध्ये खळबळ घुग्घुस : वर्धा नदीच्या घाटावरून मोठ्या प्रमाणात दिवस-रात्र रेती उपसा सुरू असल्यामुळे शासनाचा करोडो रुपयांचा ...
रेती तस्करांमध्ये खळबळ
घुग्घुस : वर्धा नदीच्या घाटावरून मोठ्या प्रमाणात दिवस-रात्र रेती उपसा सुरू असल्यामुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत होता. याबाबतची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली होती. यामुळे मंडळ अधिकारी किशोर नवले यांनी चिंचोली घाट, घोडा घाट व हल्या घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खोदकाम केले. यामुळे रेती तस्करी करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस परिसरातील वर्धा नदीचा चिंचोली घाट, नकोडा घाट, घोडा घाट, हल्या घाट व नायगाव घाट या रेती घाटाचा दोन वर्षांपासून लिलाव झालेला नाही. तरीही बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामाकरिता वर्धा नदीतून अवैधरीत्या रेती तस्करी करून तीन हजार, चार हजार रुपये प्रतिट्रॅक्टर विकली जात आहे. काही तस्कर नदीतून जेसीबी मशीनच्या साहाय्याने रेती उचल करून परिसरात साठवून ठेवत असल्याची ओरड आहे. यामुळे आज मंडळ अधिकारी किशोर नवले यांनी चिंचोली घाट, घोडा घाट व हल्या घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खोदकाम करून रस्ता बंद केला. यामुळे रेती तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.