अंबुजाच्या २८८ पॅकिंग प्लांट कामगारांना मिळणार दीड लाखाचा मेडिक्लेम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:29 AM2021-09-25T04:29:30+5:302021-09-25T04:29:30+5:30
सिमेंट कंपनीच्या पॅकिंग प्लांटमध्ये काम करणाऱ्या पॅकिंग ऑपरेटर व लोडर यांना सिमेंट धुळीचा त्रास सहन करावा लागतो. कंपनीमार्फत ...
सिमेंट कंपनीच्या पॅकिंग प्लांटमध्ये काम करणाऱ्या पॅकिंग ऑपरेटर व लोडर यांना सिमेंट धुळीचा त्रास सहन करावा लागतो. कंपनीमार्फत त्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजना करीत असतात. तरीही धुळीचा सामना करावा लागतो. आरोग्यावर मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. आरोग्यावर अधिक खर्च होऊ नये, याकरिता मराठा सिमेंट कामगार संघटना उपरवाहीचे अध्यक्ष माजी खासदार नरेश पुगलिया यांनी अंबुजा सिमेंट लिमिटेड यांच्याकडे मागणी केली होती. अंबुजा सिमेंट लिमिटेडच्या वरिष्ठांनी ही मागणी मान्य करीत, पॅकिंग प्लांटच्या पॅकर ऑपरेटर व लोडर यांना दीड लाख रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा उद्योगातील पॅकिंग प्लांटच्या २८८ कामगारांना मिळणार आहे. त्याची अंमलबजावणी १ ऑक्टोबर २०२१ पासून होणार आहे, अशी माहितीही मानवटकर यांनी दिली.