बावळी विहिरीसाठी पुरातन प्रेमींचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:34 AM2021-02-25T04:34:29+5:302021-02-25T04:34:29+5:30

मासळ बु : चिमूर तालुक्यातील प्राचीन विहिरीमुळे चिमूर तालुक्याला वैभव प्राप्त झाले. या विहिरीच्या संवर्धनाची जबाबदारी पुरातन ...

Ancient lovers' movement for Bavli well | बावळी विहिरीसाठी पुरातन प्रेमींचे आंदोलन

बावळी विहिरीसाठी पुरातन प्रेमींचे आंदोलन

Next

मासळ बु : चिमूर तालुक्यातील प्राचीन विहिरीमुळे चिमूर तालुक्याला वैभव प्राप्त झाले. या विहिरीच्या संवर्धनाची जबाबदारी पुरातन प्रेमींनी आपल्या खांद्यावर घेतली. काळाच्या ओघात चिमूर तालुक्यातील प्राचीन पायऱ्याच्या बावळी विहिरी संकटात सापडल्या असून चारही विहिरीचे अस्तित्व धोक्यात आहे. या विहिरींकडे लक्ष वेधण्यासाठी पुरातन प्रेमींनी आंदोलन केले.

चिमूर तालुक्यातील बावळी विहिरीमुळे इतिहासात मोलाची भर पडली आहे. या चारही विहिरीच्या संवर्धन होण्यासाठी पुरातन प्रेमींकडून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा कोलारा गेटकडे जाणाऱ्या मार्गावरील बाम्हणी फाट्यावरील पायऱ्याच्या बावळी विहिरीवर आंदोलन करण्यात आले. पुरातन प्रेमींकडून पुरातन विभागाला वारंवार निवेदन देऊनही विभागाने लक्ष दिले नाही. त्यामुळे चारही बावळी विहिरी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

चिमूर तालुक्यातील कोलारा तु(बाम्हणी फाटा), गडपिपरी, तिरखुरा रोडवरील बावळी विहीर, पिंपळनेरी या चारही विहिरी इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे. या विहिरीचे दगडं निघाले आहेत. या विहिरीवर कोरीव कामाचे व मजबूतीचे उत्तम उदाहरण आहे. पूर्वजांचा मौल्यवान इतिहास वाचविण्यासाठी पुरातन प्रेमींकडून आंदोलन करण्यात आले.

यावेळी पुरातन प्रेमी कवडू लोहकरे, सुशांत इंदोरकर, ऋषिकेश बाहुरे, मोहन सातपैसे, विशाल बारस्कर व पर्यटक उपस्थित होते.

कोट

आजही या विहिरीचा उपयोग शेतकऱ्यांच्या शेतात पाणी देण्यासाठी होत आहे. पुरातन विभागाने लक्ष न दिल्यास आंदोलन उग्र करु.

-कवडू लोहकरे

पुरातन प्रेमी चिमूर.

Web Title: Ancient lovers' movement for Bavli well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.