सास्ती : साखरी येथे लसीकरण केंद्र मंजूर झाले असून ३ जूनला या केंद्रावर लसीकरण होणार आहे. गावातील नागरिकांना लस घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र कढोली अंतर्गत येणाऱ्या साखरी येथे कोरोनाचे रुग्ण आढळले होते. या परिसरात गोवरी हे गाव कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. साखरी हे गाव वेकोली परिसरात येत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी साखरी येथील संघर्ष युवा विकास मंडळाच्या वतीने ॲड. प्रशांत घरोटे यांनी माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या प्राथमिक आरोग्य केंद्र कढोली भेटी दरम्यान केली होती. आरोग्य विभागाने मागणी मान्य केली असून ३ जूनला या केंद्रावर लसीकरण होणार आहे. गावातील सर्व पात्र नागरिकांनी लस घेऊन कोरोना संकटातून मुक्त व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.