रान भाजी महोत्सवात अस्सल जंगली भाज्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:32 AM2021-08-14T04:32:53+5:302021-08-14T04:32:53+5:30

येथील सरस्वती विद्यालयात गुरूवारी हा रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. महोत्सवाचे उदघाटन नागभीडचे नगराध्यक्ष प्रा. उमाजी हिरे यांनी ...

Authentic wild vegetables at the Ran Bhaji Festival | रान भाजी महोत्सवात अस्सल जंगली भाज्या

रान भाजी महोत्सवात अस्सल जंगली भाज्या

googlenewsNext

येथील सरस्वती विद्यालयात गुरूवारी हा रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. महोत्सवाचे उदघाटन नागभीडचे नगराध्यक्ष प्रा. उमाजी हिरे यांनी केले. अध्यक्षस्थानी गट विकास अधिकारी प्रणाली खोचरे होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी जाधव, केव्हीके सिंदेवाहीचे सिडाम, तालुका कृषी अधिकारी एस.डी. गजभे, मंडळ कृषी अधिकारी शिंदे यांची उपस्थिती होती. या रानभाजी महोत्सवात नागभीड तालुक्यातील विविध शेतकरी गट, शेतकरी, कृषी मित्र यांनी विविध रानभाज्यांचे स्टाॅल लावले होते. यात कडूभाजी, तांदुळजा, वास्ते, तरोटा, धोपा, पातूर, खापरखुटी, गुडवेल, धानभाजी, केना, उंदीरकानी आदी रान भाज्यांचा समावेश होता. संचालन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जितेंद्र कावळे यांनी केले.

130821\img-20210812-wa0061.jpg

भाज्यांची माहिती घेतांना नगराध्यक्ष हिरे, गट विकास अधिकारी प्रणाली खोचरे

Web Title: Authentic wild vegetables at the Ran Bhaji Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.