येथील सरस्वती विद्यालयात गुरूवारी हा रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. महोत्सवाचे उदघाटन नागभीडचे नगराध्यक्ष प्रा. उमाजी हिरे यांनी केले. अध्यक्षस्थानी गट विकास अधिकारी प्रणाली खोचरे होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी जाधव, केव्हीके सिंदेवाहीचे सिडाम, तालुका कृषी अधिकारी एस.डी. गजभे, मंडळ कृषी अधिकारी शिंदे यांची उपस्थिती होती. या रानभाजी महोत्सवात नागभीड तालुक्यातील विविध शेतकरी गट, शेतकरी, कृषी मित्र यांनी विविध रानभाज्यांचे स्टाॅल लावले होते. यात कडूभाजी, तांदुळजा, वास्ते, तरोटा, धोपा, पातूर, खापरखुटी, गुडवेल, धानभाजी, केना, उंदीरकानी आदी रान भाज्यांचा समावेश होता. संचालन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जितेंद्र कावळे यांनी केले.
130821\img-20210812-wa0061.jpg
भाज्यांची माहिती घेतांना नगराध्यक्ष हिरे, गट विकास अधिकारी प्रणाली खोचरे