बल्लारपूर जेसीआय हिरकणीने घडविले एकताचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:51 AM2021-02-18T04:51:29+5:302021-02-18T04:51:29+5:30
फोटो बल्लारपूर : विविध राज्यामधील परंपरागत वस्त्र आणि अलंकार परिधान करून अनेकात एकता तसेच सांस्कृतिक वैभवाचे दर्शन येथील जेसीआय ...
फोटो
बल्लारपूर : विविध राज्यामधील परंपरागत वस्त्र आणि अलंकार परिधान करून अनेकात एकता तसेच सांस्कृतिक वैभवाचे दर्शन येथील जेसीआय हिरकणीच्या सखींनी हेल्पिंग हॅन्ड अर्थात एकमेका साहाय्य करू या कार्यक्रमातून घडविले.
या कार्यक्रमात हळदी कुमकुम हा स्नेहभावाचा कार्यक्रम झालाच. सोबतच, बाराही महिने शहर स्वच्छतेकरिता झटणाऱ्या नगर परिषदेतील काही महिला स्वच्छता कामगारांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. इतकेच नव्हे तर या कामगार महिलांना विविध स्पर्धेमध्ये खेळायला संधी दिली. उखाणे, गीत गायन इत्यादी स्पर्धा झाल्यात. हिरकणीच्या अध्यक्ष डॉ. मंजुषा कल्लूरवार, सचिव संजना मूलचंदानी यांचे पुढाकारात झालेल्या या कार्यक्रमात स्नेहा भाटिया, कीर्ती चावडा, हर्षिता कुकरेजा, सिमरन सय्यद, वनिता रायपुरे, डॉ. कविता टांक, स्नेहा भंगानी, गंगा जोरा, सीमा भास्करवार, योजना गंगशेट्टीवार, रोहिणी नंदिगमवार, ललिता हरकरे, इत्यादींची उपस्थिती होती. आभार माजी सचिव अनिता रायपुरे यांनी मानले.