बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदोन्नतीसाठी आमदार, खासदारांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:30 AM2021-09-21T04:30:38+5:302021-09-21T04:30:38+5:30
बीएएमएस अहर्ताधारक वैद्यकीय अधिकारी मागील पंधरा ते वीस वर्षांपासून अविरत सेवा देत आहेत. दुर्गम आदिवासी नक्षलग्रस्त भागातील जनतेला अशाही ...
बीएएमएस अहर्ताधारक वैद्यकीय अधिकारी मागील पंधरा ते वीस वर्षांपासून अविरत सेवा देत आहेत. दुर्गम आदिवासी नक्षलग्रस्त भागातील जनतेला अशाही परिस्थितीत उत्तम आरोग्य सेवा देताहेत. कोरोना काळात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या जिवाची पर्वा केली नाही. भरीव योगदान देत उत्कृष्ट सेवा बजावली. बहुतांश वैद्यकीय अधिकारी ब गटात येत असताना अ वर्गाचा अतिरिक्त प्रभार अनेकांना देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील बहुतांश शासकीय आरोग्य सेवेचा भार वैद्यकीय अधिकारी गट ब यांच्याकडे आहे. असे असताना समान वेतन सन २००० च्या शासन अधिसूचनेनुसार पदोन्नती शक्य आहे. अन्याय दूर करण्याकरिता आरोग्य विभागाने संघटनेशी चर्चा करून मार्ग काढावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देताना शिष्टमंडळात डॉ. बाळ गुंजनकर, डॉ. हेमंत फुलझेले, डॉ. स्वप्निल टेंबे, डॉ. राहुल वासनिक, डॉ. किशोर भट्टाचार्य, डॉ. अशिष देवतळे यांचा समावेश होता.
200921\img_20210920_110745.jpg
image