चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, विदर्भ कोकण ग्रामीण बॅंक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ महाराष्ट्र तसेच राष्ट्रीयकृत व खासगी याप्रमाणे २६ बॅकांच्या ३०१ शाखा आहेत. जिल्ह्यात ३९५ सेवा विविध कार्यकारी संस्था आहेत. येथे मोठ्या प्रमाणात कर्मचारी कार्यरत आहेत. हे कर्मचारी शहर व ग्रामीण भागात कोरोनाच्या दहशतीतही सेवा बजावत आहेत. यामध्ये काही कर्मचारीही पॉझिटिव्ह होत आहेत. त्यामुळे बॅंकेचे व्यवहार सुरळीत राहण्याकरिता त्यांना लस देणे गरजेचे आहे. मागील वर्षी कोरोना प्रादुर्भावत बॅंकातील कर्मचाऱ्यांनी चांगली सेवा बजावली. शासनाने कोरोना काळात काम केलेल्या डॉक्टर, नर्स, परिचारिका, पोलीस विभाग, या कोरोना योद्धांना प्रथम लस दिली. परंतु, बॅंकांचे कर्मचारी व गटसचिव हे ग्रामीण व शहरी भागात सेवा बजावत असूनही त्यांना लस देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनासुद्धा कोरोना योद्धा समजून तातडीने लस देण्यात यावी, अशी मागणी सीडीसीसी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
बॅंक कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 4:30 AM