निराधार योजनेसाठी मूल तालुक्यात सव्वाकोटीच्या निधीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:17 AM2021-02-22T04:17:10+5:302021-02-22T04:17:10+5:30

केंद्र व राज्य शासन निराधार व्यक्तींसाठी तो ज्या घटकात मोडतो त्यानुसार संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली ...

The basis of Savvakoti fund in Mul taluka for Niradhar Yojana | निराधार योजनेसाठी मूल तालुक्यात सव्वाकोटीच्या निधीचा आधार

निराधार योजनेसाठी मूल तालुक्यात सव्वाकोटीच्या निधीचा आधार

Next

केंद्र व राज्य शासन निराधार व्यक्तींसाठी तो ज्या घटकात मोडतो त्यानुसार संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली जाते. सदर योजना सन १९८० पासून सुरू आहे. मूल तालुक्यात एकूण १६ हजार ९४४ लाभार्थी असून, दरमहा १ कोटी २० लाख २५ हजार १०० रुपये रुपये अनुदान दिले जात आहे. संजय गांधी योजनेच्या पहिल्याच सभेत ९४ प्रकरणांना नव्याने मंजुरी मिळाली आहे. तालुक्यात एकूण लाभार्थी संख्या १७ हजार ०३८ झाली आहे. या विविध योजनांमुळे विधवा, अपंग, रोगग्रस्त, घटस्फोटित, वृद्ध व्यक्तींना मोठा आधार मिळाला आहे.

योजना व लाभार्थी

श्रावण बाळ सर्वसाधारण योजना- ७,०४७,

श्रावण बाळ अनुसूचित जाती योजना- ६३०

श्रावण बाळ अनुसूचित जमाती- ५८०

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना- ४,१२८

संजय गांधी निराधार सर्वसाधारण योजना- २,६८५

संजय गांधी निराधार अनुसूचित जाती योजना- ५८२

संजय गांधी निराधार अनु. जमाती- ५०२

इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग योजना- १५८

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना- ६३२

कोट

संजय गांधी योजनेत येत असलेल्या लाभार्थींना अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा करीत असते. दरमहा रक्कम मिळावी यासाठी मोठ्या आशेने वाट बघत असतात. यासाठी योजनेच्या लाभार्थींना दरमहा रक्कम मिळावी यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वद्देटीवार यांच्याकडे सतत पाठपुरावा करून नियमित रक्कम मिळेल यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे.

-राकेश रत्नावार, अध्यक्ष, संजय गांधी निराधार योजना, मूल

Web Title: The basis of Savvakoti fund in Mul taluka for Niradhar Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.