अशोक डोईफोडे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचांदूर : निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या अमलनाला सिंचन प्रकल्पाला क वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला. सौंदर्यीकरणासाठी ३५ लाख रूपये मंजूर केले. त्यानंतर काम वेगाने सुरू केले. मात्र यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे अमलनाला सिंचन प्रकल्प लवकरच शंभर टक्के भरला. व सर्व विकास कामे पाण्याखाली गेली. कुंपण व भिंत पाण्याखाली आहे. सौंदर्यीकरणावर केलेला लाखो रूपयांचा खर्च योग्य नियोजन न केल्यामुळे व्यर्थ गेल्याचा आरोप केला जात आहे. सौंदर्यीकरणाची जागा उंच ठिकाणी निवडणे आवश्यक होते. उंच ठिकाणी जागा निवडली असती तर लाखो रूपयांचा खर्च व्यर्थ गेला नसता, असे आता बोलले जात आहे. वनविभागाने याचा पुनश्च विचार करून सौंदर्यीकरणाची जागा बदलावी, अशी मागणी पर्यटक इबादूल हसन सिद्धीकी यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पाटबंधारे विभागाला निवेदन दिले आहे. या ठिकाणी बोटींग, हॉटेल, रिसोर्ट तयार करणे गरजेचे आहे.वेस्टवेअरवर पर्यटकांची गर्दीअंमलनाला प्रकल्प शंभर टक्के भरल्यानंतर वेस्टवेअर सुरू होतो. ते विलोभनीय स्थळ बघण्यासाठी पर्यटकांची प्रचंड गर्दी होते. यावर्षी तर लवकरच वेस्टवेअर सुरू झाल्यामुळे पर्यटकांची गर्दी दररोज असते. रविवारी तर प्रचंड गर्दी असते. याठिकाणी वनविभागाने बोटींग, रिसोर्ट, हॉटेल, बगिचा तयार केल्यास पर्यटकांना सोईचे होईल. तसेच संरक्षण भिंत करणे गरजेचे आहे. पोलीस बंदोबस्त वाढविणेसुद्धा आवश्यक आहे. सेल्फीच्या नादात दुर्घटना होण्याची शक्यता आहे.रस्ता दुरूस्त करावाबैलमपूरपासून अमलनाला वेस्टवेअरपर्यंतचा रस्ता पूर्णपणे उघडला आहे. हा रस्ता दुरूस्त करणे गरजेचे आहे. डांबरीकरण किंवा सिमेंटीकरण करावे, अशी मागणी आहे.
सौंदर्यीकरणाची कामे पाण्याखाली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 10:19 PM
निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या अमलनाला सिंचन प्रकल्पाला क वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला. सौंदर्यीकरणासाठी ३५ लाख रूपये मंजूर केले. त्यानंतर काम वेगाने सुरू केले. मात्र यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे अमलनाला सिंचन प्रकल्प लवकरच शंभर टक्के भरला. व सर्व विकास कामे पाण्याखाली गेली.
ठळक मुद्देचुकीचे नियोजन : अमलनाला प्रकल्पातील लाखो रूपयांचा खर्च व्यर्थ