राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विदर्भात पारंपरिक शेतीवरच शेतकऱ्यांचा अधिक भर असल्याने फ ळांची शेती केवळ सरकारी कार्यक्रमांतील भाषणापुरतीच मर्यादीत राहते. त्यामुळे फ ळ शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी कृतिशील धोरण राबविले तरच जिल्ह्यातील शेतकरी कापूस, सोयाबीन आणि भाजीपाला पिकाच्या पलिकडे जावून फळशेतीची कास धरतील. यातून वाहतूकीचा खर्च कमी होऊन फ ळांच्या किंमतीही कमी होतील. फ ळ आयातीचा खर्च वाचेल. नव्या संवाद माध्यमांमुळे काळानुसार काही व्यावसायिक आता व्हॉटस्अॅपद्वारे परराज्यांतून फ ळांचा सौदा करून आॅर्डर देत आहे. पण, जिल्ह्यातील सुदृढ कृषी अर्थव्यवस्थेसाठी हे चित्र बदलणार नाही काय, असा प्रश्न चंद्रपुरातील घाऊक फ ळ व्यापाºयांनी उपस्थित केला. नाशवंत मालाची सुरक्षा आणि बाजारातील अस्थिर दराने मंदी त्रस्त असूनही जिल्ह्यातील शेतजमीन ‘बहोत अच्छी है’ अशी स्तुती केली. शेतकºयांनी फ ळ शेती करून पाहावी, असे मत ‘लोकमत’ शी बोलताना आग्रह धरला.विदर्भात फ ळांचे उत्पादन होत नाही. पारंपरिक शेती आणि भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण नाहीच्या बरोबरीतच आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र तसेच परराज्यांतून फ ळांची खरेदी करावी लागते. यापूर्वी हा सर्व व्यवहार प्रत्यक्षात संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात जावूनच करावा लागत होता. त्यामुळे वाहतूकीचा भुर्देंड बसायचा. शिवाय, लांब अंतराच्या प्रवासाची दगदग शारीरिकदृष्ट्या त्रासदायक ठरायची. मात्र, मोबाईल क्रांतीने मोठे बदल घडवून आणले. आता शेतात अथवा मोठ्या व्यापाऱ्यांच्या दुकानात जाण्याची गरज नाही. देशभरातील कुठल्याही राज्यांतून फळांची घाऊक खरेदी करणे सोपे झाले. शेतातील झाडाला फ ळे लगडल्याचे छायाचित्र व्हॉटस्अॅपवर पाठविल्यानंतर संपूर्ण निरीक्षण करून घरबसल्याच घाऊस सौदा करणारे फ ळ विक्रेते चंद्रपुरातही वाढताहेत. ही संख्या कमी असली, तरी आधुनिक संवाद माध्यमांचा खुबीने वापर करून मंदीच्या काळातही व्यवसायात स्थिरता मिळविण्यासाठी धडपडत आहेत. विविध प्रकारच्या फ ळांची गुणवत्ता, बारगेंनिंग आणि पैशाची देवाणघेवाण आदी सर्वच व्यवहारांसाठी व्हॉटस्अॅपचा उपयोग हळूहळू वाढत आहे. अर्थात या व्यवहारातही कधी-कधी फ सवणुकीचे प्रकार घडतात. मात्र, मोठे एजन्ट आणि व्यापाऱ्यांचा एकमेकांवर विश्वास असल्याने अशा घटना अपवादात्मक आहेत, असा दावा शहरातील युवा व्यावसायिक करतात. फ ळ व्यावसायिकांच्या अनेक समस्यांकडेही लक्ष वेधतात....तर खर्च कमी होऊ शकेलगुजरात राज्यातील धानू वानगान येथून गुरुवारी चंद्रपूरच्या बाजारात चिकू फ ळाचे आगमन झाले. पश्चिम महाराष्ट्रातील दोन-तीन जिल्ह्यांचा अपवाद वगळल्यास चिकू उत्पादक शेतकऱ्यांची संख्या राज्यात कमालीची घटत आहे. विदर्भात फ ळशेती करणे शक्य असूनही दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे दरवर्षी अन्य राज्यातून मोठ्या प्रमाणात आयात करावी लागत आहे. यातून खर्च वाढतो. फ ळे महाग होतात. यंदा पावसाच्या लहरीपणामुळे फ ळ शेतीला मोठा फ टका बसला. परंतु, किरकोळ व्यावसायिकांची मागणी लक्षात घेवून काही व्यापाऱ्यांनी थेट गुजरातमधून चिकू खरेदी केला.फ ळांचेही व्हावे व्यसन !फ ळ खरेदी करणे केवळ श्रीमंतांनाच शक्य आहे. मध्यवर्गीय, सर्वसामान्य व गरीबांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, ही मानसिकता कायम असल्याचे दिसून येते. मात्र, फ ळ विक्रेत्यांना हे आर्थिक तर्क चुकीचे वाटते. आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या विविध व्यसनांसाठी पैशाची उधळपट्टी केली जाते. मुलांचे लाड पुरविण्यासाठी फ ॉस्ट फु डच्या नादी लावले जाते. हाच प्रकार मोठ्या व्यक्तींच्या बाबतही घडत आहे. बदलत्या जीवन शैलीने आहाराविषयीची जागृता संपुष्ठात येत आहे. खर्रा, गुटखा, मद्य व अन्य अमली पदार्थांसाठी पैसे खर्च करणारे काही कुटुंबप्रमुख मुले अथवा कुटुंबातील सदस्यांच्या फ ळांसाठी दीड-दोनशे रुपयेही दरमहा खर्च करीत नाही. त्यामुळे फ ळांचेही आता व्यसन झाले पाहिजे, असे मत कादरभाई यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले.फ ळांची आयातनाशिक, जळगाव, कोल्हापूर, सोलापूर, कोकण, नागपूर आणि गुजरात, पंजाब, मध्य प्रदेश, केरळ, तामीळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणातून चंद्रपुरात फ ळांची आयात केली जाते.रासायनमुक्त फ ळांचा आग्रहचंद्रपुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दाताळा मार्गावरील घाऊक बाजारात फ ळ नैसर्गिकरित्या पिकविण्यासाठी दोन शितगृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय, काही मोठ्या व्यापाऱ्यांनी स्वखर्चानेही ही व्यवस्था केली. देशाच्या विविध राज्यांतून आॅर्डरद्वारे आणलेल्या फ ळांवर बाजारात कोणतीही रासायनिक प्रक्रिया केली जात नाही. किरकोळ विक्री होत नसल्याने ग्राहकांना उत्तम दर्जाचे फ ळ मिळावे, हाच बहुतेक व्यावसायिकांचा आग्रह असतो. त्यासाठी आपसात नियमित संवाद साधून उपाययोजना केली जाते. थोक विक्रीनंतर ही फ ळे बाजारात जातात. त्यामुळे खरेदी करताना ग्राहकांनीच खबरदारी घेतली पाहिजे, याकडेही व्यापाऱ्यांनी लक्ष वेधले.
तर फळशेतीतून जिल्ह्यातीलच शेतकऱ्यांना लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 1:11 AM
विदर्भात पारंपरिक शेतीवरच शेतकऱ्यांचा अधिक भर असल्याने फ ळांची शेती केवळ सरकारी कार्यक्रमांतील भाषणापुरतीच मर्यादीत राहते. त्यामुळे फ ळ शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी कृतिशील धोरण राबविले तरच जिल्ह्यातील शेतकरी कापूस, सोयाबीन आणि भाजीपाला पिकाच्या पलिकडे जावून फळशेतीची कास धरतील.
ठळक मुद्देचंद्रपुरातील घाऊक फ ळबाजार : नाशवंत फ ळांची सुरक्षा आणि अस्थिर दराने व्यावसायिक हैराण